शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा : अजलन शाह चषक

By admin | Updated: March 25, 2015 21:10 IST

सतबीर, चिंग्लेनसाना, मनदीप सिंहला संधी

सतबीर, चिंग्लेनसाना, मनदीप सिंहला संधी
सरदारकडे कर्णधारपद कायम : अजलन शाह चषकासाठी भारतीय हॉकी संघ जाहीर
नवी दिल्ली : मलेशियातील इपोह येथे १२ एप्रिलपासून सुरू होणार्‍या अजलन शाह चषक हॉकी स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघ जाहीर करण्यात आला आहे़ या संघात चिंग्लेनसाना सिंह, सतबीर सिंह आणि मनदीप सिंह यांचा समावेश करण्यात आला आहे़
स्पर्धेसाठी जाहीर झालेल्या १८ सदस्यीय संघातून मिडफिल्डर दानिश मुस्तबा, स्ट्राईकर ललित उपाध्याय आणि डिफेंडर गुरजिंदर सिंह यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे़ संघाच्या कर्णधारपदी सरदार सिंहला कायम ठेवण्यात आले आहे, तर उपकर्णधाराची जबाबदारी पी़आऱ श्रीजेश निभावणार आहे़
संघात श्रीजेश आणि हरज्योत सिंह यांच्या रूपात दोन गोलकिपर असतील़ जर गुरबाज सिंह, रपिंदर पाल सिंह, वीरेंद्र लाकडा, कोथाजित सिंह आणि व्ही़ आऱ रघुनाथ डिफेन्सची जबाबदारी स्वीकारतील़ मिडफिल्डमध्ये सरदार, मनप्रीत सिंह, धरमवीर सिंह, चिंग्लेनसाना आणि एस़ के़ उथप्पा, तर फॉरवर्डलाईनमध्ये रमनदीप सिंह, एस़व्ही. सुनील, आकाशदीप सिंह, निकीन थिमैया, सतबीर आणि मनदीप जबाबदारी पार पाडतील़
संघाचे नवीन प्रशिक्षक पॉल वॉन यांच्या मार्गदर्शनाखाली ही पहिलीच स्पर्धा असेल़ वॉन म्हणाले, या स्पर्धेत आम्ही सकारात्मक सुरुवात करण्यासाठी इच्छुक आहोत़ या स्पर्धेसाठी खेळाडूंनी विशेष मेहनत घेतली आहे़ याच बळावर संघ उत्कृष्ट कामगिरी करील अशी आशा आहे़
या स्पर्धेत भारताव्यतिरिक्त मलेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कोरिया आणि कॅनडा या संघांचा समावेश आहे़ स्पर्धेत भारताचा पहिला सामना ५ एप्रिल रोजी कोरियाशी होणार आहे़ त्यानंतर ६ एप्रिलला न्यूझीलंड, मलेशिया विरुद्ध ८ एप्रिल, कॅनडाविरुद्ध ९ एप्रिल आणि ११ एप्रिल रोजी भारताला ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे़
स्पर्धेसाठी जाहीर संघ :
गोलकिपर : पी.आर. श्रीजेश , हरज्योत सिंह, डिफेंडर : गुरबाज सिंह, रुपिंदर पाल सिंह, वीरेंद्र लाकडा, कोथाजीत सिंह, व्ही. आर. रघुनाथ, मिडफिल्डर : मनप्रीत सिंह, सरदार सिंह, धरमवीर सिंह, चिंग्लेनसाना सिंह, एस़के. उथप्पा, फॉरवर्ड : रमनदीप सिंह, एस़व्ही. सुनील, आकाशदीप सिंह, निकिन थिमैया, सतबीर सिंह, मनदीप सिंह़