शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
2
Maharashtra SSC Result 2026 LIVE Updates: दहावीचा निकाल जाहीर! ९२.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, कोकण विभाग सर्वात अव्वल
3
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
4
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
5
Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी
6
EXCLUSIVE: क्रिकेटमुळे लोकप्रियता झटपट मिळते, पण तो लौकिक टिकवणं महत्त्वाचं, पाया पक्का हवा!
7
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
8
Mahua Moitra : Video - "चोर-चोर, TMC चोर"; निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
9
Garud Puran: मुखाग्नी केवळ मुलगाच देऊ शकतो का? गरुड पुराणात याबाबत काय लिहिलंय पाहा
10
Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?
11
चीनमध्ये २ माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंड, 'असा' काय केला गुन्हा?, ज्यानं जिनपिंग भडकले
12
Hantavirus: चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
13
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
14
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
15
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
16
बंगळुरूच्या जोडप्यानं श्रीलंकेहून पोहत गाठला भारत; १० तास ४५ मिनिटांत ३२ किलोमीटर अंतर कापलं
17
Viral Video: रस्त्याच्या कडेला पडलेल्या होत्या तीन बॅगा, आतमध्ये मिळाले २ कोटी ८३ लाख, पण...
18
Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २१३ आणि निफ्टी ९३ अंकांच्या घसरणीसह खुला
19
Chanakya Niti: गर्दीत तुमची 'छाप' पाडायचीय? मग चाणक्य नीतीचे हे १० नियम कधीच विसरू नका!
20
१० वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष; दुकानदाराकडून अत्याचाराचा प्रयत्न, पुण्याच्या मध्यवर्ती भागातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा आफ्रिका

By admin | Updated: December 18, 2014 22:39 IST

अमला, वान जिलची चमक

अमला, वान जिलची चमक
दक्षिण आफ्रिकेची दमदार मजल
सेंचुरियन : हाशिम अमलाचे विक्रमी द्विशतक आणि स्टियान वान जिलची पदार्पणाच्या कसोटीत नाबाद शतकी खेळी याच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडीजविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात गुरुवारी दुसऱ्या दिवशी पहिला डाव ५ बाद ५५२ धावसंख्येवर घोषित केला. अमलाने (२०८) कारकीर्दीतील तिसरे द्विशतक झळकाविले. मायदेशात द्विशतकी खेळी करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा पहिला कर्णधार ठरला. त्याने एबी डिव्हिलियर्ससोबत (१५२) चौथ्या विकेटसाठी ३०८ धावांची विक्रमी भागीदारी केली. वान जिलने पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकाविले. अशी कामगिरी करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा पाचवा फलंदाज ठरला. वान जिलने शतक पूर्ण केल्यानंतर कर्णधार अमलाने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला.
दक्षिण आफ्रिकेची पहिल्या दिवशी सुरुवातीला ३ बाद ५७ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर अमला व डिव्हिलियर्स यांनी विंडीजच्या गोलंदाजांना संधी दिली नाही. त्यांनी आज ३ बाद ३४० धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. डिव्हिलियर्सला वैयक्तिक धावसंख्येत आज केवळ ११ धावांची भर घालता आली. फिरकीपटू सुलेमान बेनने डिव्हिलियर्सला तंबूचा मार्ग दाखविला. डिव्हिलियर्सने २३५ चेंडूंना सामोरे जाताना १६ चौकार २ षटकार ठोकले.
अमला वैयक्तिक तिसरे तर दक्षिण आफ्रिकेतील पहिले द्विशत झळकाविण्यात यशस्वी ठरला. त्याला वान जिलने योग्य साथ दिली. अमला व जिल यांनी पाचव्या विकेटसाठी १५५ धावांची भागीदारी केली. बेनने अमलाची मॅरेथॉन खेळी संपवली. अमलाच्या द्विशतकी खेळीत २२ चौकारांचा समावेश आहे. जिलने पदार्पणाच्या कसोटीत शतकी खेळी करताना ॲण्ड्य्रू हडसन, जॅक रुडोल्फ, ॲल्विरो पीटरसन व फॅफ ड्यू प्लेसिस यांच्या यादीत स्थान मिळविले. जिलने १३० चेंडूंना सामोरे जाताना १५ चौकार लगाविले. यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डिकाक १८ धावा काढून नाबाद राहिला. त्यात २ षटकारांचा समावेश आहे. विंडीजतर्फे केमार रोच व सुलेमान बेन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. (वृत्तसंस्था)