शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण आफ्रिका ‘रनआऊट’; १९१ धावांत ढेपाळले

By admin | Updated: June 12, 2017 01:04 IST

भारताविरुद्ध नेहमीच चांगली कामगिरी करणारा हाशिम अमला आणि डिकॉक भारतीय गोलंदाजांच्या अचूक टप्प्यावरील गोलंदाजीसमोर अपेक्षित धावगतीने धावा करूशकले नाहीत

भारताविरुद्ध नेहमीच चांगली कामगिरी करणारा हाशिम अमला आणि डिकॉक भारतीय गोलंदाजांच्या अचूक टप्प्यावरील गोलंदाजीसमोर अपेक्षित धावगतीने धावा करूशकले नाहीत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला ५0 धावांपर्यंत पोहोचण्यासाठी १३ व्या षटकापर्यंत प्रतीक्षा करावी लागली.  अमला आणि डिकॉक यांनी दबाव हटवण्याचा प्रयत्न केला. अमला आक्रमक पवित्रा अवलंबण्याच्या परिस्थितीत असतानाच त्याला अश्विनने १८ व्या षटकांत तंबूत धाडले. अमलाने कटचा फटका खेळण्यास थोडा उशीर केला आणि चेंडू बॅटला लागून महेंद्रसिंग धोनीच्या ग्लोव्हजमध्ये विसावला. अमलाने ५४ चेंडूंत ३ चौकार व एक षटकार मारला. डिकॉक आणि फाफ डुप्लेसिस यांनी स्ट्राईक रोटेट करीत धावा घेतल्या. त्यामुळे २२ व्या षटकांत संघाची धावसंख्या तिहेरी आकड्यात पोहोचली.डिकॉकने ६८ व्या चेंडूंत त्याचे १४ वे वनडे अर्धशतक पूर्ण केले; परंतु जडेजाला पुढील षटकात स्वीपचा फटका खेळणे त्याला महागात पडले. पहिल्याच चेंडूवर जडेजाचे पायचीतचे अपील पंचांनी फेटाळून लावले; परंतु या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने पुढील चेंडूवर डिकॉकला त्रिफळाबाद करीत तंबूत धाडले. डिकॉकच्या ७२ चेंडूंच्या खेळीत ४ चौकारांचा समावेश आहे. आधीच्या २ सामन्यांत ४ आणि 0 धावांवर बाद होणारा अ‍ॅबी डिव्हिलियर्स (१६) पुन्हा एकदा मोठी खेळी करू शकला नाही. डुप्लेसीसने त्याला धाव घेण्यासाठी आवाज दिला आणि तो त्याला रोखू शकला नाही. त्याने स्वत:च्या अंदाजात सूर मारत स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याआधी हार्दिक पंड्याचा थ्रो धोनीपर्यंत पोहोचला होता. डुप्लेसिसने नंतर डेव्हिड मिलर (१) यालादेखील धावबाद केले. डुप्लेसिस चेंडूला कट करून धाव घेण्यासाठी धावला; परंतु तो पुन्हा क्रिजमध्ये परतला. तोपर्यंत मिलरदेखील त्याच्या एंडला पोहोचला होता. स्वत: डुप्लेसिस मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. हार्दिक पंड्याच्या सुरेख चेंडूंवर पुढे खेळण्याच्या प्रयत्नात तो त्रिफळाबाद होऊन तंबूत परतला.  बुमराहने त्यानंतर फुलटॉसवर एंडिल फिलकुवायो (४) याला पायचीत केले. भुवनेश्वरने कॅगिसो रबादा आणि मोर्ने मॉर्कलला सलग चेंडूवर बाद केले तर इम्रान ताहीर धावबाद होणारा तिसरा फलंदाज ठरला. जेपी ड्युमिनी २0 धावांवर नाबाद राहिला.