शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

सौरव घोषालची सहज विजयी सलामी

By admin | Updated: September 11, 2015 00:31 IST

भारताचा अव्वल स्क्वॉशपटू सौरव घोषालने इंडियन स्क्वॉश सर्किट स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रात भारताच्याच कुश कुमारचा धुव्वा उडवून विजयी सलामी दिली. तसेच या स्पर्धेत आता

मुंबई : भारताचा अव्वल स्क्वॉशपटू सौरव घोषालने इंडियन स्क्वॉश सर्किट स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रात भारताच्याच कुश कुमारचा धुव्वा उडवून विजयी सलामी दिली. तसेच या स्पर्धेत आता केवळ सौरवच्या रुपानेच भारताचे आव्हान टिकून आहे. क्रिकेट क्लब आॅफ इंडिया (सीसीआय) येथे झालेल्या या सामन्यात सौरवने युवा कुशला स्क्वॉशचे धडे देताना केवळ ३९ मिनिटांत विजयाची नोंद केली. एकतर्फी झालेल्या या सामन्यात सौरवने आक्रमक खेळाचा धडाका करताना कुशला फारशी संधी न देता ११-२, १५-१३, ११-४ असा दणदणीत विजय मिळवला.त्याचवेळी मुंबईकर महेश माणगावकर आणि हरिंदरपाल सिंग संधू यांचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आल्याने भारताच्या आशा आता केवळ सौरववर अवलबून आहेत. नुकताच झालेल्या एनएससीआय सत्रामध्ये अंतिम सामन्यात महेशचा अव्वल खेळाडू इंग्लंडच्या अ‍ॅड्रीयन वॉलर विरुध्द पराभव झाला होता. यावेळी महेशने वॉलरला कडवी झुंज दिली. मात्र विजय मिळवण्यात यश न आल्याने त्याला गत अंतिम सामन्यातील वचपा काढता आला नाही. ८१ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात वॉलरने १३-११, ११-४, ७-११, ११-५ असा विजय मिळवून महेशचे आव्हान संपुष्टात आणले.अन्य एका सामन्यात ईजिप्तच्या माझेन हेशामविरुध्द पहिला गेममध्ये बाजी मारुन आघाडीवर असलेल्या हरिंदरपाल सिंग संधूला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. यानंतर हेशामने आक्रमक खेळ करुन सलग तीन गेम जिंकताना संधूला ५-११, ११-५, ११-८, ११-५ असे नमवले. (क्रीडा प्रतिनिधी)