शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

बॅटचा आकार होणार मर्यादित

By admin | Updated: June 4, 2016 02:20 IST

माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखालील आयसीसी क्रिकेट समितीने सूचना केली आहे की, मेरिलबोन क्रिकेट क्लबला (एमसीसी) क्रिकेटमध्ये समतोल साधण्यासाठी बॅटच्या

लंडन : माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखालील आयसीसी क्रिकेट समितीने सूचना केली आहे की, मेरिलबोन क्रिकेट क्लबला (एमसीसी) क्रिकेटमध्ये समतोल साधण्यासाठी बॅटच्या आकाराची मर्यादा निश्चित करण्याबाबत गांभीर्याने विचार करायला पाहिजे. टी-२० आणि वन-डे क्रिकेटमध्ये मोठी धावसंख्या उभारणे आणि चुकीचा फटका खेळल्यानंतरही चेंडू सीमारेषेच्या पल्याड जात असल्यामुळे जाणकारांना चिंता सतावत आहे. जाणकारांच्या मते क्रिकेटची वाटचाल फलंदाजाचा खेळ म्हणून होत आहे. ‘स्वीट स्पॉट’वर नियंत्रण असावेआयसीसीने लॉर्डस्मध्ये क्रिकेट समितीच्या झालेल्या चर्चेची विस्तृत माहिती देताना म्हटले आहे की, एमसीसीने बॅट आणि चेंडू यामध्ये समतोल साधण्यासाठी करण्यात येणाऱ्या बदलांबाबत समितीला सूचना देण्यास सांगण्यात आले होते. समितीला एमसीसीतर्फे एक पत्र मिळाले. त्यात विविध तर्क आणि आकडेवारी आधारावर अलीकडच्या कालावधीत बॅट अधिक मजबूत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचे मुख्य कारण ‘स्वीट स्पॉट’चा आकार अधिक मोठा असणे आहे. त्यात म्हटले आहे की, समितीच्या मते एमसीसीने बॅट व चेंडूमध्ये समतोल साधण्यासाठी बॅटच्या आकाराची मर्यादा निश्चित करण्याबाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.’ब्रिटिश निकषानुसार हेल्मेट असावेसमितीमध्ये राहुल द्रविड, माहेला जयवर्धने, अ‍ॅण्ड्य्रू स्ट्रॉस यांच्यासारख्या माजी आंतरराष्ट्रीय कर्णधारांचा समावेश आहे. अनेक फलंदाज ब्रिटिश सुरक्षा निकषानुसार (बीएसएस) हेल्मेटचा वापर करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. आयसीसीचे वैद्यकीय सल्लागार डॉ. क्रेग रॅनसन यांनी दुखापती टाळण्यासाठी सावधगिरी बाळगण्याबाबत कार्यक्रम सादर केला. त्यानंतर समितीने हेल्मेटबाबत सुरक्षिततेच्या मुद्द्यावर चर्चा केली. अनेकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ब्रिटिश सुरक्षा निकष (बीएसएस) पूर्ण न करणाऱ्या हेल्मेटचा वापर करतात. आयसीसीने बीएसएस निकष पूर्ण करणारे हेल्मेट वापरण्यास अनिवार्य करण्याची शिफारस करायला हवी, असे समितीने म्हटले आहे. क्रिकेट समितीच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आलेल्या अन्य मुद्द्यांमध्ये दिवस-रात्र कसोटी, पंचांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची पद्धत (डीआरएस), स्पोर्टिंग विकेटच्या माध्यमातून बॅट व चेंडू यामध्ये समतोल साधणे आणि बॅटचा आकार निर्धारित करणे, आदींचा समावेश आहे. ‘जामठा’च्या खेळपट्टीबाबत चिंतामाजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळेच्या अध्यक्षतेखालील आयसीसीच्या क्रिकेट समितीने शुकवारी खेळपट्टीच्या दर्जाबाबत (विशेषत: खेळपट्ट्या स्थानिक संघांना अनुकूल तयार करणे) चिंता व्यक्त केली. समितीने कसोटी क्रिकेटबाबत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. त्यात यजमान देश आपल्या संघाला अनुकूल खेळपट्ट्या तयार करण्याच्या प्रथेवर चिंता व्यक्त करण्यात आली. आयसीसीचे चेअरमन शशांक मनोहर यांचे गृहमैदान असलेल्या नागपूरमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यानचा कसोटी सामना केवळ अडीच दिवसांमध्ये संपला होता. यावर टीकेची झोड उठली होती. आयसीसीच्या खेळपट्टी व मैदान समितीने त्यासाठी अधिकृत ताकीद दिली होती.