शुभम कोठारीचे सहा बळी महाराष्ट्राची आसामवर मात

By Admin | Updated: December 8, 2015 01:52 IST2015-12-08T01:52:20+5:302015-12-08T01:52:20+5:30

सोलापूर: मंगलदई(आसाम) स्पोर्ट्स असोसिएशन स्टेडियमवर महाराष्ट्र आणि आसाम यांच्यात झालेल्या कुचबिहारी करंडक सामन्यात महाराष्ट्राने शुभम कोठारीने दुसर्‍या डावात घेतलेल्या पाच बळीच्या जोरावर आसामवर 10 विकेट्सने विजय मिळवला़ या सामन्यात सोलापूरचा डावखुरा फिरकीपटू शुभम कोठारीने दोन्ही डावात मिळून सहा बळी घेतल़े महाराष्ट्राने पहिल्या डावात 48़2 षटकात सर्वबाद 204 धावा केल्या़ यात ऋतुराज गायकवाडने 108 धावांची शतकी खेळी केली़ यू़ एस़ अग्रवालने 36 धावा केल्या़ आसामकडून मृण्मॉय दत्तने 69 धावा देताना सहा तर रियन परागने 83 धावा देताना चार बळी घेतल़े प्रत्युत्तरात आसामचा पहिला डाव 52़4 षटकात 122 धावात गारद झाला़ बिकाश सिंगने सर्वाधिक 41 धावा केल्या़ मृण्मय दत्तने 29 तर जितुमोनी कालिताने 16 धावा केल्या़ सोलापूरकडून ज़ेडी़ भराडे याने

Sixteen Shubham Kothari defeats Maharashtra in Assam | शुभम कोठारीचे सहा बळी महाराष्ट्राची आसामवर मात

शुभम कोठारीचे सहा बळी महाराष्ट्राची आसामवर मात

लापूर: मंगलदई(आसाम) स्पोर्ट्स असोसिएशन स्टेडियमवर महाराष्ट्र आणि आसाम यांच्यात झालेल्या कुचबिहारी करंडक सामन्यात महाराष्ट्राने शुभम कोठारीने दुसर्‍या डावात घेतलेल्या पाच बळीच्या जोरावर आसामवर 10 विकेट्सने विजय मिळवला़ या सामन्यात सोलापूरचा डावखुरा फिरकीपटू शुभम कोठारीने दोन्ही डावात मिळून सहा बळी घेतल़े महाराष्ट्राने पहिल्या डावात 48़2 षटकात सर्वबाद 204 धावा केल्या़ यात ऋतुराज गायकवाडने 108 धावांची शतकी खेळी केली़ यू़ एस़ अग्रवालने 36 धावा केल्या़ आसामकडून मृण्मॉय दत्तने 69 धावा देताना सहा तर रियन परागने 83 धावा देताना चार बळी घेतल़े प्रत्युत्तरात आसामचा पहिला डाव 52़4 षटकात 122 धावात गारद झाला़ बिकाश सिंगने सर्वाधिक 41 धावा केल्या़ मृण्मय दत्तने 29 तर जितुमोनी कालिताने 16 धावा केल्या़ सोलापूरकडून ज़ेडी़ भराडे याने 18 धावात चार बळी, आय़एस़ सय्यदने 30 धावात तीन बळी घेतल़े शुभम कोठारी व यू़ एस़ अग्रवाल यांनी प्रत्येकी एकेक बळी घेतला़ आसामने दुसर्‍या डावात 123 धावा केल्या़ यात संदीप पॉल मझुमदारने 47 धावा केल्या़ महाराष्ट्रकडून गोलंदाजी करणार्‍या सोलापूरच्या शुभम कोठारीने 33 धावा देताना पाच बळी तर यू़ एस़ अग्रवालने 41 धावात पाच बळी घेतल़े महाराष्ट्राने पहिल्या डावात 82 धावांची आघाडी मिळवली होती़ दुसर्‍या डावात महाराष्ट्राला विजयासाठी 42 धावांची गरज होती़ महाराष्ट्राने दुसर्‍या डावात ऋतुराज गायकवाड नाबाद 24 आणि एस़डी़ जगदाळे 16 धावांच्या जोरावर 12़5 षटकात 42 धावा केल्या़ (क्रीडा प्रतिनिधी)
कोट0000
प्रशिक्षक योगेश इंडी, सुवर्ण स्पोर्ट्स अकॅडमी
सोलापूरचा उगवता डावखुरा फिरकीपटू शुभम कोठारी सातत्याने आपल्या गोलंदाजीने चांगले प्रदर्शन करीत आह़े महाराष्ट्र संघाकडून खेळताना तो आपल्या गोलंदाजीच्या जोरावर मोलाची कामगिरी करताना संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आह़े यापुढेदेखील तो संघाकडून चांगली गोलंदाजी करेल अशी अपेक्षा आह़े

Web Title: Sixteen Shubham Kothari defeats Maharashtra in Assam