शहरं
Join us  
Trending Stories
1
Kerala CM Selection Update : केरळचा नवा मुख्यमंत्री कोण? नावावर अखेर शिक्कामोर्तब; दिल्लीत हालचालींना वेग
2
Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार
3
"२२ वर्षांत ५४ परदेश दौरे, राहुल गांधींच्या ट्रिपचा खर्च ६० कोटी"; कमाईवरुन भाजपाचा खोचक सवाल
4
Harish Rana : मृत्यूनंतरही हरीश राणा ठरले 'हिरो'; कुटुंबाच्या एका निर्णयाने कोर्टाचेही डोळे पाणावले!
5
Dollar vs Rupee : रुपया २० पैशांनी घसरुन विक्रमी नीचांकी स्तरावर; डॉलरच्या तुलनेत ९६ च्या जवळ पोहोचला
6
Virat Kohli Record : किंग कोहलीचा ‘विराट’ अवतार! एका डावात ५ विक्रमांची नोंद
7
Cannes 2026: मराठमोळ्या अभिनेत्याने मान गर्वाने उंचावली! झळकला कान्सच्या रेड कार्पेटवर, म्हणाला...
8
घटस्फोटाच्या केस दरम्यान पतीने केलं किळसवाणं कृत्य; पत्नीने पोलिसांना आपबिती ऐकवताच सगळे हादरले
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर धडाम! कालच्या तेजीनंतर आज किमतीत घसरण, पाहा लेटेस्ट रेट
10
Neet Exam Case: कन्सल्टन्सीच्या नावे शोधायचा सावज, शुभमने केले होते स्वत:चे ‘नीट’ ब्रॅण्डिंग
11
नीट पेपरफुटीचे पुणे कनेक्शन, तरुणीसह तिघांना घेतले ताब्यात; शुभमच्या चौकशीतून लोखंडेचे नाव समोर 
12
Video - सेल्स गर्लचा १.६६ कोटींवर डल्ला! सोन्याच्या दागिन्यांनी भरले खिसे, मालकाला घातला गंडा
13
या देशात पेट्रोल-डिझेलचा एकही थेंब उरला नाही; सरकारने केली 'ब्लॅकआउट'ची घोषणा
14
"लोकांना माझं बोलणं आवडत नाही, पण..." जिनपिंग यांची स्तुती करताना ट्रम्प यांनी विरोधकांना असं झापलं!
15
शनी जयंती २०२६: कर्माचा हिशोब अन् धनाची आवक; 'या' राशींसाठी १६ मे ठरणार गेम-चेंजर!
16
Netherlands Research: तुम्ही बिअर पिता का? मग डास तुम्हालाच जास्त चावणार; जाणून घ्या त्यामागचं कारण!
17
आता होर्मुझची गरज नाही! भारताने आखली ४००० कोटींची नवी योजना; गॅस पुरवठा होणार अधिक सुरक्षित
18
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
19
Supreme Court: "हिंदू धर्म ही जीवनशैली, श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाणे अनिवार्य नाही, घरात दिवाही पुरेसा"
20
सामान्यांच्या खिशाला कात्री; सोने-चांदी ते दूध अन् पेट्रोलपर्यंत... गेल्या ४ दिवसांत देशात काय बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

साश्रू नयनांनी ह्युजला निरोप

By admin | Updated: December 4, 2014 01:55 IST

क्रिकेट जगताने बुधवारी साश्रु नयनांनी आॅस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिलिप ह्युज याला अखेरचा निरोप दिला. ह्युजची मॅक्सविले येथे अंत्ययात्रा काढण्यात आली

मॅक्सविले : क्रिकेट जगताने बुधवारी साश्रु नयनांनी आॅस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिलिप ह्युज याला अखेरचा निरोप दिला. ह्युजची मॅक्सविले येथे अंत्ययात्रा काढण्यात आली, त्यावेळी क्रीडा जगतासह आॅस्ट्रेलियातील अनेक नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली होती. अवघ्या काही वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत ह्युजने केवळ संघ सहकाऱ्यांचाच नव्हे तर चाहत्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. त्याच्या या निधनाने प्रत्येकाच्या मनात एक पोकळी निर्माण झाली. ह्युजला निरोप देताना प्रत्येकजण ढसाढसा रडत होते.
ह्यूजच्या अंतिमसंस्काराचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. क्रिकेटला आयुष्य मानणाऱ्या आणि मैदानावरूनच जगाचा निरोप घेणाऱ्या २५ वर्षिय ह्युजला बुधवारी दफन करण्यात आले. केळ्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या छोट्याश्या मॅक्सविले शहरातून क्रिकेट कारकिर्द घडविणाऱ्या ह्युजच्या या निधनाने सर्वांच्या मनाला चटका लावला. आॅस्ट्रेलियन क्रिकेटपटू, कुटुंब, मित्र, नातेवाइक आणि चाहत्यांनी ह्युजला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. प्रत्येक जण आपापल्या परिने ह्युजच्या आठवणींना उजाळा देत होता. याच दरम्यान आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क आणि ह्युजचा मित्र याला पुन्हा अश्रु अनावर झाले.
हजारो नागरिकांमध्ये उपस्थित असलेल्या आॅस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी एबोट यांनाही आपल्या भावनांवर आवर घालता आली नाही. यावेळी शेन वॉर्न, रिकी पॉटिंग, ग्लेन मॅकग्रा, ब्रायर लारा, रिचर्ड हेडली, विराट कोहली आदी दिग्गज क्रिकेटपटूंचीही उपस्थिती होती. ह्युजचे वडिल आणि भावासह क्लार्क, अ‍ॅरोन फिंच यांनी ह्युजच्या कॉफिनला खांदा दिला. याचे थेट प्रक्षेपण सिडनी क्रिकेट ग्राऊंडसह आॅस्ट्रेलियाच्या काही प्रमुख शहरांमध्ये मोठ्या स्क्रिनवर दाखविण्यात आले. गत आठवड्यात शैफिल्ड शील्डच्या सामन्यात ह्यूजचा चेंडू लागून मृत्यू झाला होता. आॅस्ट्रेलियन संघात कमबॅक करण्यासाठी उत्सुक असलेल्या ह्युजला भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळाली होती, परंतु नियतिला हे मान्य नसावे. ह्युजच्या सन्मानार्थ अनेकांनी आपल्या घरा, कार्यालया आणि स्पोटर््स ग्राऊंडबाहेर बॅट ठेवल्या होत्या. ह्युजच्या अखेरच्या दर्शनावेळी त्याची बॅट कॉफिनजवळ ठेवण्यात आली होती. ह्युजनी अंत्ययात्रा सुरू झाल्यावर ‘डोंट लेट द सन गो डाऊन’ हे गाणेही वाजविण्यात आले. यात्रेपाठी आॅस्ट्रेलियन खेळाडू आणि मित्र परिवार होता, तसेच रस्त्याच्या दुतर्फा ह्युजला निरोप देण्यासाठी गर्दी जमली होती.