शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

शार्दुलची डरकाळी, पंजाब स्पर्धेबाहेर

By admin | Updated: May 15, 2017 07:05 IST

रायजींग पुणे सुपर जायंट्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात गहुंजे स्टेडिअमवर झालेल्या हाय व्होल्टेज सामन्यात मुंबईकर शार्दुलच्या डरकाळीने किंग्ज पंजाबला थेट

आकाश नेवे / आॅनलाईन लोकमत

पुणे, दि. 15 - रायजींग पुणे सुपर जायंट्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात गहुंजे स्टेडिअमवर झालेल्या हाय व्होल्टेज सामन्यात मुंबईकर शार्दुलच्या डरकाळीने किंग्ज पंजाबला थेट स्पर्धेबाहेर केले आहे. गेल्या काही सामन्यांत सलग विजय मिळवत प्ले आॅफच्या स्पर्धेत राहणाऱ्या किंग्ज पंजाबला या सामन्यात पुण्या विरोधात विजय मिळवणे गरजेचे होते. पंजाब पुण्याला कडवी टक्कर देईल असा सगळ््यांचाच होरा होता. मात्र मुळच्या मुंबईच्या असलेल्या शार्दुल ठाकूरने ४ षटकांत ३ बळी घेत पंजाबच्या गोलंदाजीचे कंबरडेच मोडले. त्याने शॉन मार्र्श, कर्णधार ग्लेन मॅक्सवेल आणि राहूल तेवतिया यांना बाद केले. तसेच चार षटकांत फक्त १९धावाच त्याने दिल्या. सामनावीर ठरलेल्या जयदेव उनाडकटने सुरेख मारा करत एक षटक निर्धाव टाकले. त्याने दोन बळी घेतले.एरवी दमदार सुरूवात करणाऱ्या पंजाबच्या फलंदाजांची हाराकिरी या सामन्यात त्यांना पराभवाकडे घेऊन गेली. सामन्यातील पहिल्या चेंडूवर उनाडकटने गुप्तीलला बाद केले. त्यानंतर अक्षर पटेल वगळता एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. त्याने २२ धावा केल्या तर पूर्ण संघाला ७३ धावा करता आल्या. पुणे संघाने आपल्या यशाचे श्रेय गोलंंदाजांना दिले आहे. इम्रानताहीरची अनुपस्थिती अ‍ॅडम झाम्पाने जाणवु दिली नाही.७८ धावांचे माफक लक्ष्य पूर्ण करताना पुणे संघाला फारसे कष्ट पडले नाही. राहूल त्रिपाठी, अजिंक्य रहाणे आणि स्टिव्हन स्मिथ यांनी सहज संघाला विजय मिळवून दिला. इशांत शर्मा याचे हे पूर्ण सत्र बळी विना गेले. या सामन्यातही इशांतला बळी घेता आला नाही. त्याने टाकलेल्या एकमेव षटकांत १२ धावा कुटल्या. या सत्रात इशांतने एकुण १०८ चेंडू टाकले मात्र एकही बळी नघेण्याची त्याची ही निचांकी कामगिरी ठरली.