शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉ'क; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
2
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
3
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
4
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
5
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
6
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
7
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
8
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
9
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
10
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
11
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
12
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
13
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
14
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
15
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
16
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
17
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
18
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
19
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
20
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
Daily Top 2Weekly Top 5

विंडीजविरुद्धची मालिका निर्धोक : बीसीसीआय

By admin | Updated: October 10, 2014 04:44 IST

वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू आणि त्यांच्या बोर्डादरम्यान वेतन वादावरून खडाजंगी सुरू असली तरी मालिकेवर कुठलेही संकट नसल्याचे स्पष्टीकरण बीसीसीआयने दिले.

नवी दिल्ली : वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू आणि त्यांच्या बोर्डादरम्यान वेतन वादावरून खडाजंगी सुरू असली तरी मालिकेवर कुठलेही संकट नसल्याचे स्पष्टीकरण बीसीसीआयने दिले. बीसीसीआय सचिव संजय पटेल म्हणाले, ‘भारत-विंडीज मालिकेला कुठलाही धोका नाही हे मी स्पष्ट करूइच्छितो. सर्व सामने निर्धारित वेळापत्रकानुसार होतील. मी स्वत: विंडीज बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यांनी मला कुठलाही व्यत्यय येणार नाही, असे आश्वासन दिले. मला विंडीज बोर्डाचे अध्यक्ष डेव्ह कॅमरून यांचा ई-मेल मिळाला. त्यात त्यांनी संकट टाळण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबद्दल बीसीसीआयचे आभार मानले आहेत.’ मालिका आटोपल्यानंतर हे संकट सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्यास बीसीसीआयला आनंद होईल, असे सांगून पटेल पुढे म्हणाले, ‘तीन कसोटी, पाच वन-डे आणि एक टी-२० सामन्यांचा समावेश असलेली ही मालिका सहीसलामत पार पाडण्यात आम्हाला आनंद वाटेल. भविष्यातील दौरा कार्यक्रमांतर्गत हा दौरा असून, या कॅलेंडरचे उल्लंघन करण्यात येऊ नये. सर्व सदस्य देश या कॅलेंडरचे पालन करीत असतात. विंडीजचे खेळाडू व्यावसायिक असल्यामुळे ते एकत्र बसून समस्येवर तोडगा काढू शकतात. आमची गरज असेल तर मध्यस्थी करण्यास बीसीसीआय तयार आहे.’कोची सामन्यात खोळंबा येऊ नये यासाठी बीसीसीआयने विंडीज खेळाडूंना किंवा त्यांच्या बोर्डाला पैसे दिल्याच्या वृत्ताचे पटेल यांनी खंडन केले. ते म्हणाले, ‘या केवळ अफवा आहेत. काहीही तथ्य नाही. बीसीसीआयने कुठलीही आर्थिक देवाण-घेवाण केली नाही आणि अशा आर्थिक देवाण-घेवाणीची योजना देखील नाही. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. क्रिकेट बोर्ड या नात्याने समस्येवर तोडगा कसा काढावा या संदर्भात आम्ही केवळ सल्ला देऊ शकतो.’