शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
3
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
4
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
5
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
6
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
7
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
8
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
9
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
10
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
11
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
12
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
13
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
14
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
15
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
16
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
17
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
18
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
19
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
20
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
Daily Top 2Weekly Top 5

सेरेनाचे विक्रमी ग्रँडस्लॅम एक पाऊल दूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 03:42 IST

यूएस ओपन : कॅनडाच्या बियांका आंद्रिस्कूविरुद्ध भिडणार

न्यूयॉर्क : विक्रमी २३ ग्रँडस्लॅम जेतेपद पटकविणारी अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विलियम्स हिने यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. पाचवी मानांकित युक्रेनची एलिना स्वितोलिना हिला सेरेनाने ६-३, ६-१ असे सहज पराभूत केले. कारकीदीर्तील २४ वे ग्रँडस्लॅम जिंकून दिग्गज मार्गारेट कोर्टच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याचे सेरेनाचे लक्ष्य आहे.

सेरेनापुढे अंतिम फेरीत १५ वी मानांकित कॅनडाची बियांका आंद्रिस्कू हिचे आव्हान असेल. दुसऱ्या उपांत्य लढतीत स्वित्झर्लंडची १३ वी मानांकित बेलिंडा बेंकिक हिला बियांकाने ७-६ (७-३), ७-५ असे पराभूत केले आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. आधीच्या सामन्यात स्वितोलिनाने ज्या पद्धतीचा खेळ केला होता, त्यामुळे सेरेनाला ती जोरदार टक्कर देईल, अशी अपेक्षा होती. पण सेरेनाने तिला सामन्यात डोके वर काढू दिले नाही. पहिला सेट जिंकताना स्वितोलिनाने थोडीशी झुंज दिली. तरीही सेरेनाने सेट ६-३ असा जिंकला. दुसºया सेटमध्ये तर स्वितोलिनाने शस्त्र खाली टाकल्याचा भास झाला. त्यामुळे सरळ दोन सेटमध्ये सेरेनाने सामना जिंकला आणि अंतिम फेरीत धडक मारली. या विजयासह सेरेनाने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

युजिनी बूचार्डनंतर (२०१४) १९ वर्षांची आंद्रिस्कू ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी कॅनडाची दुसरी टेनिसपटू ठरली. आंद्रिस्कूने यूएस ओपनचे जेतेपद पटकविल्यास मारिया शारापोवापाठोपाठ ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविणारी ती दुसरी सर्वांत युवा खेळाडू बनेल. मात्र यासाठी तिला दिग्गज सेरेना विलियम्सचे तगडे आव्हान परतवावे लागेल. मारियाने २००६ ला अमेरिकन ओपनचे जेतेपद पटकविले होते.पहिल्यांदा अमेरिकन ओपनच्या मुख्य फेरीत खेळणाºया आंद्रिस्कूने पहिला सेट पॉर्इंट गमविल्यानंतर सामना जिंकला हे विशेष. (वृत्तसंस्था) 

टॅग्स :serena williamsसेरेना विल्यम्सTennisटेनिस