शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
4
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
5
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
6
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
7
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
8
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
9
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
10
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
12
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
13
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
14
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
15
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
16
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
17
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
18
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
19
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
20
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
Daily Top 2Weekly Top 5

सतपालना पद्मभूषण

By admin | Updated: January 26, 2015 03:05 IST

देशातील सर्वश्रेष्ठ कुस्ती गुरु महाबली सतपाल यांना प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे,

नवी दिल्ली : देशातील सर्वश्रेष्ठ कुस्ती गुरु महाबली सतपाल यांना प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे, परंतु आॅलिम्पिक पदक विजेते सुशीलकुमार आणि सायना नेहवाल यांना पद्म पुरस्कारासाठी आणखी वाट पहावी लागणार आहे. सरकारने रविवारी संध्याकाळी पद्म पुरस्काराची घोषणा केली. आॅलिम्पिक पदक विजेत्या सुशीलकुमार आणि योगेश्वर दत्त यांचे गुरु सतपाल यांना पद्मभूषण, तर, हॉकीपटू सरदारसिंग, बॅडमिंटनस्टार पी व्ही सिंधू, क्रिकेटपटू मिताली राज, यांच्यासोबत सबा अंजुम आणि अरुनिमा सिंग यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.भारतीय कुस्तीला नवी ओळख देणाऱ्या आणि देशाला आॅलिम्पिक पदक विजेते पैलवान देणाऱ्या महाबली सतपाल यांनी आपले पूर्ण जीवन कुस्तीसाठी समर्पित केले आहे. आजमितीला ते देशातील पहिल्या क्रमांकाचे कुस्ती गुरु म्हणून ओळखले जातात. भारतीय कुस्तीचे पितामह गुरु हनुमान यांचे शिष्य असलेल्या सतपाल यांनी १९८२ च्या नवीदिल्ली आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. राष्ट्रकुल स्पर्धेत तीनवेळा रौप्यपदक जिंकणाऱ्या सतपाल यांनी आशियाई स्पर्धेचे रौप्य आणि कांस्यपदकही जिंकले आहे. बिजिंग २00८ आणि लंडन २0१२च्या आॅलिम्पिकमध्ये अनुक्रमे कांस्य आणि रौप्यपदक जिंकणारा मल्ल सुशीलकुमार आणि लंडन आॅलिम्पिकची कांस्यपदक विजेती बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात यावा अशी शिफारस क्रीडा मंत्रालयाने गृह मंत्रालयाकडे केली होती, परंतु त्यांच्यावर शिक्कामोर्तब झाले नाही.क्रीडा मंत्रालयाने सुशीलचे नाव अगोदर पाठविले होते, त्यावर सायनाने आक्षेप घेत आपलाही या पुरस्कारासाठी विचार व्हावा अशी मागणी केली होती. क्रीडा खात्याने नंतर तिच्याही नावाचा प्रस्ताव पाठविला होता. यावेळी क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आम्ही फक्त शिफारस करण्याचे काम करतो, अंतिम निर्णय गृहमंत्रालयच घेत असते, असे म्हटले होते. यातून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार कोणाला मिळणार याबद्दल उत्सुकता होती. पण आता या दोघांनाही पद्मभूषणसाठी पुढील वर्षाची वाट पहावी लागणार आहे.