सानिया मिर्झा अव्वल स्थानी कायम

By Admin | Updated: December 2, 2015 04:05 IST2015-12-02T04:05:26+5:302015-12-02T04:05:26+5:30

देशातील नंबर वन टेनिस खेळाडू युकी भांबरी याची ताज्या एटीपी मानांकनानुसार दोन स्थानांनी घसरण झाली आहे. तो ९३ व्या स्थानी आहे,

Sania Mirza remains in top place | सानिया मिर्झा अव्वल स्थानी कायम

सानिया मिर्झा अव्वल स्थानी कायम

नवी दिल्ली : देशातील नंबर वन टेनिस खेळाडू युकी भांबरी याची ताज्या एटीपी मानांकनानुसार दोन स्थानांनी घसरण झाली आहे. तो
९३ व्या स्थानी आहे, तर सोमदेव देववर्मन याची दोन स्थानांनी घसरण झाली असून तो आता १८१ व्या स्थानावर आहे.
साकेत माईनेनी हा १७१ व्या स्थानी, रामकुमार रामनाथन २६० व्या स्थानी पोहोचला आहे. त्याने १३ स्थानांनी सुधारणा केली आहे. दुहेरी गटात, रोहन बोपण्णा नवव्या स्थानावर कायम आहे. लिएंडर पेस ४१ व्या, तर पुरव राजा ९३ व्या क्रमांकावर आहे. डब्ल्यूटीए युगुल मानांकनात सानिया मिर्झा अव्वल स्थानावर कायम आहे. तिची जोडीदार स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीससुद्धा ११३५५ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. एकेरीत अंकिता रैना ही २५५ व्या स्थानावर आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Sania Mirza remains in top place