सानिया, मार्टिना संयुक्त नंबर वन

By Admin | Updated: January 17, 2016 03:23 IST2016-01-17T03:23:36+5:302016-01-17T03:23:36+5:30

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि स्वीत्झर्लंडची मार्टिना हिंगीस महिला गटातील दुहेरीच्या जागतिक मानांकनात संयुक्तरीत्या अव्वल क्रमांकावर विराजमान झाल्या आहेत.

Sania, Martina United No. One | सानिया, मार्टिना संयुक्त नंबर वन

सानिया, मार्टिना संयुक्त नंबर वन

मेलबोर्न : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि स्वीत्झर्लंडची मार्टिना हिंगीस महिला गटातील दुहेरीच्या जागतिक मानांकनात संयुक्तरीत्या अव्वल क्रमांकावर विराजमान झाल्या आहेत.
सध्या डब्ल्यूटीएच्या रँकिंगमध्ये सानिया आणि मार्टिना यांचे प्रत्येकी ११३९५ गुण आहेत. भारत आणि स्वीस जोडीने सलग ३० वा विजय मिळविताना शुक्रवारी (दि.१५) सिडनी इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले होते. या जोडीने एकत्र खेळताना आतापर्यंत एकूण ११ वेळा जेतेपदाला गवसणी घातली आहे.
सोमवार (१८) पासून सुरू होणाऱ्या आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेपूर्वी संयुक्तरीत्य अव्वल क्रमांकावर झेप घेतल्यामुळे सानिया आणि मार्टिना यांचे मनोधैर्य आणखी उंचावण्यास मदत होणार आहे. टेनिस कारकीर्दीत स्वीत्झर्लंडची मार्टिना हिंगीस दुहेरी क्रमवारीत ३५ आठवड्यांपर्यंत नंबर वन राहिलेली आहे, तर सानिया मिर्झा ४१ आठवड्यांपासून दुहेरी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर विराजमान आहे.

Web Title: Sania, Martina United No. One