शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘लकी गर्ल’ हिंगीससोबत सानिया, पेस फायनलमध्ये

By admin | Updated: September 11, 2015 04:32 IST

भारतीय खेळाडूंसाठी ‘लकी गर्ल’ ठरलेली स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस हिच्यासोबत अव्वल मानांकित सानिया मिर्झा हिने महिला दुहेरीत तसेच अनुभवी लिएंडर पेसने मिश्र दुहेरीत अमेरिकन

न्यूयॉर्क : भारतीय खेळाडूंसाठी ‘लकी गर्ल’ ठरलेली स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस हिच्यासोबत अव्वल मानांकित सानिया मिर्झा हिने महिला दुहेरीत तसेच अनुभवी लिएंडर पेसने मिश्र दुहेरीत अमेरिकन ओपन टेनिसची गुरुवारी अंतिम फेरी गाठली. सानिया-हिंगीस या अव्वल जोडीने उपांत्य फेरीत इटलीची सारा इराणी-फ्लाव्हिया पेनेटा या ११व्या मानांकित जोडीचा सलग सेटमध्ये ६-४, ६-१ असा ७७ मिनिटांत पराभव केला. मिश्र दुहेरीच्या उपांत्य सामन्यात पेस-मार्टिनाने भारतीय खेळाडू रोहण बोपन्ना तसेच चायनिज-तैपेईची यंग जान चान यांच्यावर सलग सेटमध्ये ६-२, ७-५ने ६१ मिनिटांत विजय साजरा केला. हिंगीसने यंदा विम्बल्डनमध्ये पेससोबत मिश्र आणि सानियासोबत महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले होते. अमेरिकन ओपनमध्ये कामगिरीची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. सानिया-मार्टिना जोडीने उपांत्य लढतीत आत्मविश्वासासह खेळून एकही डबल फॉल्टची चूक केली नाही. या जोडीने पहिला सेट २१ आणि दुसरा सेट २८ मिनिटांत जिंकला. जेतेपदासाठी या जोडीला अमेरिकेची बेथानी माटेक सँड्स आणि सॅम क्वेरी या जोडीविरुद्ध खेळावे लागेल. बेथानी-सॅम यांनी पोलंडचा लुकास कोबोट आणि झेक प्रजासत्ताकाची आंद्रिया लावाकोवा यांचा सलग सेटमध्ये ६-४, ६-३ असा फडशा पाडला. सानिया व पेस यांनी आपापल्या गटांत अंतिम फेरी गाठली असताना बोपन्ना मात्र मिश्र दुहेरीपाठोपाठ पुरुष दुहेरीतही पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडला. बोपन्ना- फ्लोरिना मेर्जिया यांना ब्रिटनचा डोमिनिक इंग्लोत व स्वीडनचा रॉबर्ट लिडस्टेड या बिगरमानांकित जोडीकडून ८० मिनिटांत ६-७, ३-६ पराभवाचा धक्का बसला. पेस पुरुष दुहेरीत आणि सानिया मिश्र दुहेरीत आधीच पराभूत झाले आहेत.