साक्षी, विनेश भारतीय संघात

By Admin | Updated: July 8, 2017 01:14 IST2017-07-08T01:14:31+5:302017-07-08T01:14:31+5:30

आॅलिम्पिक कांस्य विजेती महिला मल्ल साक्षी मलिकसह विनेश फोगट हिने पॅरिसमध्ये पुढील महिन्यात आयोजित विश्व कुस्ती

Sakshi, Vinesh in the Indian squad | साक्षी, विनेश भारतीय संघात

साक्षी, विनेश भारतीय संघात

लखनौ : आॅलिम्पिक कांस्य विजेती महिला मल्ल साक्षी मलिकसह विनेश फोगट हिने पॅरिसमध्ये पुढील महिन्यात आयोजित विश्व कुस्ती चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात स्थान मिळविले आहे.
येथे विविध वजन गटाच्या चाचणीनंतर भारतीय कुस्ती महासंघाने संघ जाहीर केला.
रिओ आॅलिम्पिकमध्ये ५८ किलो गटात कांस्य जिंकणारी साक्षी आता ६० किलो गटात खेळते. तिने आशियाई चॅम्पियनशिपचे रौप्य जिंकले असून आगामी स्पर्धेत ती याच गटात खेळेल. याच स्पर्धेत ५५ किलो गटात दुसरी रौप्य विजेती विनेश महिलांच्या ४८ किलो गटात परतली असून तिने या गटासाठी सहज पात्रता मिळविली. (वृत्तसंस्था)
विश्व स्पर्धेसाठी स्थान निश्चित करण्यात यशस्वी ठरलेल्या अन्य मल्लांमध्ये शीतल (५३ किलो), ललिता (५५ किलो), पूजा ढांडा (५८ किलो), शिल्पी (६३ किलो), नवज्योत कौर (६९ किलो) आणि पूजा (७५ किलो ) यांचा समावेश आहे. विनेशशिवाय फोगट भगिनींपैकी कुणीही भारतीय संघात नाहीत. गीता आणि बबिता चाचणीत सहभगी झाल्या नव्हत्या तर रिता आणि संगीता या पत्रातेचा अडथळा पूर्ण करण्यात अपयशी ठरल्या.(वृत्तसंस्था)

Web Title: Sakshi, Vinesh in the Indian squad