सायना सहाव्या तर सिंधू दहाव्या स्थानावर कायम

By Admin | Updated: June 23, 2016 20:47 IST2016-06-23T20:41:25+5:302016-06-23T20:47:36+5:30

सायना नेहवाल आणि पी़व्ही़सिंधू गुरुवारी जाहीर झालेल्या नव्या बॅडमिंटन रँकिंगमध्ये अनुक्रमे आपल्या सहाव्या आणि दहाव्या स्थानावर कायम आहेत़

Saina was sixth and Sindhu finished seventh | सायना सहाव्या तर सिंधू दहाव्या स्थानावर कायम

सायना सहाव्या तर सिंधू दहाव्या स्थानावर कायम

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 23 - भारताच्या रिओ आॅलिम्पिकमध्ये पदकांच्या आशा सायना नेहवाल आणि पी़व्ही़सिंधू गुरुवारी जाहीर झालेल्या नव्या बॅडमिंटन रँकिंगमध्ये अनुक्रमे आपल्या सहाव्या आणि दहाव्या स्थानावर कायम आहेत़ सायनाने नुकतेच दुसऱ्यांदा आॅस्ट्रेलियन ओपनचा किताब जिंकला होता़ सिंधूचे मात्र यावर्षीच्या सुरुवातीला मलेशियामध्ये किताब जिंकल्यानंतर प्रदर्शन चढ उताराचे राहिले आहे; मात्र आॅलिम्पिकपूर्वी जवळपास दीड महिन्यापूर्वी ती टॉपटेनमध्ये आली आहे़ पुरुषांमध्ये किदांबी श्रीकांत अकराव्या आणि अजय जयराम २४ व्या स्थानावर कायम आहेत़ पुरुष दुहेरीमध्ये मनू अत्री आणि बी़ सुमित रेड्डी २१ व्या तर महिला दुहेरीमध्ये ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा १६ व्या स्थानावर कायम आहेत़(वृत्तसंस्था)

Web Title: Saina was sixth and Sindhu finished seventh