सायना क्वॉर्टर फायनलमध्ये

By Admin | Updated: April 29, 2016 02:44 IST2016-04-29T02:44:27+5:302016-04-29T02:44:27+5:30

सायना नेहवाल हिने गुरुवारी थायलंडची नितचानोन जिंदापोल हिच्यावर सरळ गेममध्ये विजय नोंदवीत येथे सुरू असलेल्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेच्या क्वॉर्टर फायनलमध्ये धडक दिली.

In the Saina quarter-final, | सायना क्वॉर्टर फायनलमध्ये

सायना क्वॉर्टर फायनलमध्ये

वुहान : आॅलिम्पिक कांस्य विजेती भारतीय स्टार सायना नेहवाल हिने गुरुवारी थायलंडची नितचानोन जिंदापोल हिच्यावर सरळ गेममध्ये विजय नोंदवीत येथे सुरू असलेल्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेच्या क्वॉर्टर फायनलमध्ये धडक दिली.
सायनाला जिंदापोलविरुद्ध विजय मिळविताना थोडादेखील घाम गाळावा लागला नाही. पाचवी मानांकित सायनाने जिंदापोलवर
२१-१४, २१-१८ ने विजय साजरा
केला. थायलंडच्या या खेळाडूविरुद्ध सायनाचा विजयी विक्रम ७-०
असा झाला आहे. सायनाची
पुढील लढत तिसरी मानांकित
चीनची खेळाडू शिजियान वांग हिच्याविरुद्ध राहील.
शिजियांगविरुद्ध सायना
मागच्या दोन्ही लढतीत पराभूत झाल्यामुळे उभय खेळाडूंचा रेकॉर्ड ६-७ असा झाला. सायनाने वांगला २०१४ च्या दुबई सुपर सिरीजमध्ये हरविले होते.
पी. व्ही. सिंधू हिला मात्र एक तास रंगलेल्या अटीतटीच्या संघर्षात चायनीज तायपेईची ताई जू यिंग हिच्याकडून २१-१३, २०-२२, ८-२१ ने पराभवाचे तोंड पाहावे लागले. सिंधू स्पर्धेबाहेर पडली आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: In the Saina quarter-final,