मलेशियन ओपनच्या उपांत्य फेरीत सायना पराभूत

By Admin | Updated: April 6, 2015 08:24 IST2015-04-04T12:10:40+5:302015-04-06T08:24:09+5:30

भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालला मलेशियन ओपन सुपर सीरिज प्रीमिअर बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे.

Saina loses in Malaysian Open semis | मलेशियन ओपनच्या उपांत्य फेरीत सायना पराभूत

मलेशियन ओपनच्या उपांत्य फेरीत सायना पराभूत

>ऑनलाइन लोकमत
क्वालालांपूर, दि. ४ - भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालला मलेशियन ओपन सुपर सीरिज प्रीमिअर बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. चीनच्या ली झुरेईने तिचा २१-१३,१७-२१,२०-२२ असा पराभव केला. या पराभवानांतर तिने जागतिक क्रमवारीतील अव्वल क्रमांकही गमावला आहे.
शुक्रवारी खेळल्या गेलेल्या संघर्षपूर्ण लढतीत सायनाने चीनच्या सून यूचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. मात्र शनिवारी झालेल्या सामन्यात तिला ली झुरेईकडून पराभव पत्करावा लागला. 
 

Web Title: Saina loses in Malaysian Open semis