सह्याद्री संघाची विजयी सलामी

By Admin | Updated: April 20, 2017 04:29 IST2017-04-20T04:29:31+5:302017-04-20T04:29:31+5:30

सह्याद्री क्रीडा मंडळाने सन्मित्र क्रीडा मंडळावर ३२-३० अशी केवळ २ गुणांनी बाजी मारत आमदार-नगरसेवक कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली

Sahyadri team's winning salute | सह्याद्री संघाची विजयी सलामी

सह्याद्री संघाची विजयी सलामी

मुंबई : सह्याद्री क्रीडा मंडळाने सन्मित्र क्रीडा मंडळावर ३२-३० अशी केवळ २ गुणांनी बाजी मारत आमदार-नगरसेवक कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याचप्रमाणे, चेंबूर क्रीडा केंद्र संघानेही विजयी सुरुवात करताना सागर क्रीडा मंडळाचा २५-२२ आसा पराभव केला.
ओम भारत क्रीडा मंडळाच्या वतीने खारमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत जोगेश्वरीच्या सह्याद्री मंडळ आणि घाटकोपरचा सन्मित्र मंडळ
या संघात थरारक लढत झाली.
सौरभ चव्हाणच्या आक्रमक चढाई आणि सौरभ पार्टेच्या दमदार
पकडीमुळे सह्याद्री संघाने सामन्यावर वर्चस्वर राखले. सांघिक खेळाच्या जोरावर सह्याद्री संघाने मध्यांतराला १५-१० अशी आघाडी घेतली. विश्रांतीनंतर सन्मित्रच्या अंकुश साळवीने शानदार खेळाचे प्रदर्शन करत सामन्यात आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न केला, मात्र अन्य खेळाडूंची योग्य साथ न लाभल्याने त्यांना अवघ्या २ गुणांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला.
दुसरीकडे, चेंबूर क्रीडा संघाने सांताक्रुझच्या सागर क्रीडा मंडळावर २५-२२ असा तीन गुणांनी विजय मिळवला. रामचंद्र आलडाल आणि अजय चव्हाण यांच्या अष्टपैलू खेळामुळे मध्यांतराला १५-१० अशी ५ गुणांची निर्णायक आघाडी घेतली. सागर क्रीडा मंडळाच्या संतोष पाटील आणि विक्रांत जाधव यांची झुंज अपयशी ठरली.
तसेच, श्री सिद्धी संघाने अटीतटीच्या सामन्यात बाजी मारताना संघर्ष क्रीडा मंडळाचा १६-१४ असा पराभव केला. मध्यांतराला झालेल्या ८-८ अशा बरोबरीनंतर अनिकेत पार्लेकर आणि पंकज भोसले
यांच्या शानदार खेळामुळे सिद्धी
संघाने वर्चस्व राखले आणि मोक्याच्यावेळी गुणांची कमाई करुन बाजी मारली. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Sahyadri team's winning salute