शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

रुथलेस एफसीचा विजयी ‘पंच’

By admin | Updated: June 21, 2016 03:13 IST

स्ट्रायकर अ‍ॅग्नेलो पिकार्डोच्या शानदार दोन गोलच्या जोरावर रुथलेस फुटबॉल क्लबने एकतर्फी झालेल्या सामन्यात आयसी कोल्ट फुटबॉल क्लबचा ५-० असा धुव्वा उडवत बोरीवली फुटबॉल प्रीमियर लीग स्पर्धेत आगेकूच केली

मुंबई : स्ट्रायकर अ‍ॅग्नेलो पिकार्डोच्या शानदार दोन गोलच्या जोरावर रुथलेस फुटबॉल क्लबने एकतर्फी झालेल्या सामन्यात आयसी कोल्ट फुटबॉल क्लबचा ५-० असा धुव्वा उडवत बोरीवली फुटबॉल प्रीमियर लीग स्पर्धेत आगेकूच केली. दुसऱ्या बाजूला रेमायकन एसए आणि आय.सी. युनायटेड यांच्यातील सामना १-१ असा बरोबरीत सुटला. बोरीवली स्पोटर््स फाऊंडेशनच्या वतीने सेंट अ‍ॅसिसि मैदानात सुरु असलेल्या या स्पर्धेत रुथलेस संघाने तुफानी आक्रमण करताना आयसी कोल्टला दबावाखाली ठेवले. २१ व्या मिनिटाला पिकार्डोने प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला चकमा देत गोल लगावला. त्यानंतर लगेचच २८ व्या मिनिटाला शशांक रावने गोल करुन संघाला मध्यांतराला २-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. विश्रांतीनंतर कोल्ट संघाने पिछाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र रुथलेसच्या बचावापुढे त्यांचा निभाव लागला नाही. विनायक सकपाळने ४९ व्या व किगन परेराने ५८ व्या मिनिटाला गोल करुन रुथलेसला ४-० अशा आघाडीवर नेले. पिकार्डोने यानंतर ६० व्या मिनिटाला गोल करुन संघाच्या विजयावर शिक्का मारला.दुसरीकडे रेमायकन एसए व आयसी युनायटेड यांनी प्रत्येकी एक गोल करुन सामना १-१ असा बरोबरीत सोडवला. रेमायकन एसएकडून रोर्क कुथिनोने तर आयसी युनायटेडकडून वेन त्रिनादादे यांनी प्रत्येकी एक गोल केला. (क्रीडा प्रतिनिधी)