शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

धावपटू धरमवीर ‘फेल’

By admin | Updated: August 4, 2016 03:50 IST

रिओ आॅलिम्पिकपूर्वी भारतीय क्रीडाविश्वात खळबळ माजविणारा ‘डोपिंगचा डंख’ अद्यापही कायम आहे.

नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकपूर्वी भारतीय क्रीडाविश्वात खळबळ माजविणारा ‘डोपिंगचा डंख’ अद्यापही कायम आहे. २०० मीटर स्पर्धेतील धावपटू धरमवीरसिंग याची गेल्या महिन्यात स्पर्धेदरम्यान झालेल्या ‘अ’ चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह असल्याचे संकेत मिळताच मंगळवारी त्याला रिओकडे रवाना होण्यास मज्जाव करण्यात आला.क्रीडा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार वाडाच्या नव्या आचारसंहितेत आजीवन बंदीची तरतूद नाही. केवळ आठ वर्षांची बंदी शक्य आहे. धरमवीर बंगळुरू येथील इंडियन ग्रॅण्डप्रिक्समध्ये २०.४५ सेकंद वेळ नोंदवित २०० मीटर दौडीत पात्र ठरला होता. आॅलिम्पिक पात्रता वेळ २०.५० सेकंद अशी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्याची कामगिरी खालावली असल्याने बंगळुरू येथे त्याने नोंदविलेल्या वेळेवर अ‍ॅथलेटिक्स तज्ज्ञांनी शंका व्यक्त केली होती. राष्ट्रीय शिबिरात सहभागी होण्याऐवजी त्याने रोहतक येथे आपल्या खासगी प्रशिक्षकांकडून धडे घेण्यास प्राधान्य दिले होते. याआधी इंदरजित सिंग आणि नरसिंग यादव हेदेखील डोपिंगमध्ये अपयशी ठरले होते. त्यातल्या त्यात, ‘नाडा’च्या शिस्तपालन समितीने मात्र नरसिंगला कटाचा बळी ठरल्याचे सांगून नुकतीच क्लीन चिट दिली. (वृत्तसंस्था)>‘रिओ’ला जाण्यापासून रोखलेआॅलिम्पिकमध्ये ३६ वर्षांनंतर पात्र ठरलेला भारताचा पहिला धावपटू होण्याचा मान मिळालेला धरमवीर याच्याबाबत शंका निर्माण होताच काल रात्री त्याला रिओकडे जाणाऱ्या विमानाचे तिकीटही नाकारण्यात आले. ११ जुलै रोजी बंगळुरू येथे इंडियन ग्रां-प्रीदरम्यान राष्ट्रीय डोपिंगविरोधी संस्थेने (नाडा) घेतलेल्या चाचणीच्या अ नमुन्यात ‘अ‍ॅनाबॉलिक स्टेरॉईड’ आढळल्याचे संकेत मिळाले आहेत. नाडा किंवा भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने मात्र या वृत्तास दुजोरा दिलेला नाही. धरमवीरला काल रिओकडे रवाना व्हायचे होते, पण त्याला येथेच थांबण्यास सांगण्यात आले. नाडाने त्याला ब चाचणी देण्यास इच्छुक आहेस का, अशी विचारणा केली. ही चाचणी सात दिवसांत देणे बंधनकारक आहे. ब नमुना पॉझिटिव्ह आल्यास धरमवीरचे आॅलिम्पिकबाहेर होणे निश्चित राहील. त्याचा हा दुसरा गुन्हा राहील. अशा वेळी त्याच्यावर आठ वर्षांची बंदी येणे क्रमप्राप्त आहे. २०१२ च्या आंतरराज्य अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत डोप चाचणी देण्यास नकार देताच धरमवीरला १०० मीटर दौडीचे सुवर्ण परत करावे लागले होते.