शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

रोहित शर्माची ५ व्या स्थानी झेप

By admin | Updated: January 25, 2016 02:31 IST

नुकताच झालेल्या आॅस्टे्रलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत तुफान फलंदाजी केलेल्या रोहित शर्माने आपल्या कारकिर्दीत सर्वोच्च कामगिरी करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या

दुबई : नुकताच झालेल्या आॅस्टे्रलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत तुफान फलंदाजी केलेल्या रोहित शर्माने आपल्या कारकिर्दीत सर्वोच्च कामगिरी करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) एकदिवसीय क्रमवारीत पाचवे स्थान पटकावले. विशेष म्हणजे त्याने ८ स्थानांची जबरदस्त झेप घेताना पाचवे स्थान मिळवले असून हे त्याचे सर्वोत्तम मानांकन आहे. या मालिकेत मालिकावीर ठरलेल्या रोहितने ५ सामन्यांतून ४४१ धावा फटकावल्या असून यामध्ये दोन शतके आणि अखेरच्या सामन्यातील ९९ धावांच्या शानदार खेळीचा समावेश आहे. विराट कोहलीनंतर आयसीसी रँकिंगमध्ये सर्वोत्तम स्थान असलेला रोहित दुसरा भारतीय ठरला आहे. कोहली सध्या जागतिक क्रमवारीत द्वितीय स्थानी असून निराशाजनक कामगिरीच्या गर्तेत सापडलेला कर्णधार महेंद्रसिंह धोनीची १३ व्या स्थानी घसरण झाली आहे.मालिकेत केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर मुंबईकर रोहितने ५९ गुण मिळवले असून तो कोहलीहून ६४ गुणांनी पिछाडीवर आहे. दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हीलियर्स अव्वल स्थानी कायम असून कोहली त्याच्याहून ७५ गुणांनी मागे आहे. त्याचवेळी अव्वल दहामध्ये समावेश असलेला शिखर धवन तिसरा भारतीय असून तो सातव्या क्रमांकावर कायम आहे.(वृत्तसंस्था)गोलंदाजीत घसरण...भारताचा आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विन दोन स्थानांनी ११ व्या स्थानी घसरला आहे. तर भुवनेश्वर कुमार ७ स्थानांनी २० व्या स्थानी आला आहे. अक्षर पटेल आणि उमेश यादव यांचीदेखील अनुक्रमे ४४ व्या व ४१ व्या स्थानी घसरण झाली आहे. त्याचवेळी आॅस्टे्रलियाकडून जेम्स फॉल्कनरच्या क्रमवारीत ७ स्थानांनी घसरण झाली असून तो २८ व्या स्थानी आहे. विशेष म्हणजे अव्वल ५० गोलंदाजांमध्ये केवळ भारताच्या रवींद्र जडेजाची प्रगती झाली असून तो दोन स्थानांनी २२ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.