शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रोहितच गाठून देऊ शकतो मुंबईला पैलतीर

By admin | Updated: May 13, 2016 03:21 IST

चाहत्यांना यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्सबाबत भाकीत वर्तविणे कठीण जात आहे. सोंगटी फेकल्यानंतर कुठला नंबर येणार, हे निश्चित नसते. अगदी त्याचप्रमाणे मुंबई इंडियन्सची यंदाच्या मोसमातील कामगिरी आहे.

रवी शास्त्री लिहितो़ - चाहत्यांना यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्सबाबत भाकीत वर्तविणे कठीण जात आहे. सोंगटी फेकल्यानंतर कुठला नंबर येणार, हे निश्चित नसते. अगदी त्याचप्रमाणे मुंबई इंडियन्सची यंदाच्या मोसमातील कामगिरी आहे. एखाद्या दिवशी हा संघ कोलकाताविरुद्ध शानदार विजय मिळवतो, तर एखाद्या दिवशी याच संघाची १०० धावांचे लक्ष्य गाठतानाही दमछाक होते. पण, मुंबई इंडियन्सची कामगिरी गेल्या मोसमाप्रमाणेच आहे, हे विसरता येणार नाही. गेल्या वर्षी मुंबई इंडियन्स संघानेच जेतेपद पटकावले होते, हे आपणास ठाऊक असेलच. मुंबई इंडियन्स संघाने यंदाच्या मोसमात वेगळी रणनीती वापरली आहे. मुंबईने अन्य संघाच्या या वेळी एका अतिरिक्त गोलंदाजाला संधी देण्याचा पर्याय निवडला आहे. मुंबई इंडियन्सला आता गेल्या चार लढतीत चमकदार कामगिरी करणाऱ्या किंग्स इलेव्हन पंजाब संघाच्या आव्हानाला सामोरे जायचे आहे. पंजाब संघाला काही लढतींमध्ये पराभवही स्वीकारावा लागला असला, तरी पराभवातील अंतर केवळ एक-दोन फटक्यांचे होते. संदीप शर्मा, अक्षर पटेल आणि मोहित शर्मा यांच्याविरुद्ध तुम्हाला सावधगिरी बाळगणे आवश्यक ठरते. आता पंजाब संघाच्या दिमतीला करियप्पाही आहे. त्याने एकाच षटकात विराट कोहली व केएल राहुल यांना तंबूचा मार्ग दाखवला होता. स्टोइनिसनेही आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. पंजाब संघ पुढील मोसमासाठी आशा पल्लवित होतील, अशा वळणावर यंदा आपली मोहीम थांबविणार आहे. मुरली विजय शानदार फॉर्मात आहे. हाशिम अमलाला अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. दक्षिण आफ्रिकेचा हा दिग्गज फलंदाज येथे आपली छाप सोडण्याच्या निर्धारानेच हजारो किलोमीटरचा प्रवास करून येथे दाखल झाला आहे. मुंबई संघाला उर्वरित तीनपैकी दोन सामन्यांत विजय मिळवणे आवश्यक आहे. रॉयल चॅलेंजर्स बॅँंगलोरविरुद्ध केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास मुंबई संघ उत्सुक आहे. आरसीबी संघाला १६० धावांत रोखण्याची कामगिरी प्रशंसेस पात्र आहे. (टीसीएम)मुंबईने यशाचे शिखर गाठण्याचा चंग बांधला असल्याचे भासत आहे; पण मुंबई संघाचे यश कर्णधार रोहित शर्माच्या कामगिरीवर अवलंबून आहे. रोहित म्हणजे या संघाचे इंजिन आहे. त्याच्याकडून संघाला चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना त्याच्या कामगिरीवर संघाची भिस्त असते. मुंबईच्या मोहिमेला आता वादळाचे स्वरूप प्राप्त झाले असून, रोहित हा असा एकटा ‘कॅप्टन’ आहे की, जो संघाला पैलतीर गाठून देऊ शकतो.