सामन्यापूर्वी धोनीची चाहत्यांसोबत रंगपंचमी

By Admin | Updated: March 23, 2016 12:31 IST2016-03-23T12:31:21+5:302016-03-23T12:31:56+5:30

सामन्यापूर्वी मंगळवारी बंगळुरुमध्ये कर्णधार महेंद्रसिंह धोनीने भारतीय चाहत्यांसोबत रंगपंचमीचा आनंद लुटला.

Rangpurchimi with Dhoni fans before the match | सामन्यापूर्वी धोनीची चाहत्यांसोबत रंगपंचमी

सामन्यापूर्वी धोनीची चाहत्यांसोबत रंगपंचमी

ऑनलाइन लोकमत 

बंगऴुरु, दि. २३ - बंगळुरुच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर आज भारत आणि बांगलादेशमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकपमधला महत्वाचा सामना होत आहे. मात्र या सामन्यापूर्वी मंगळवारी बंगळुरुमध्ये कर्णधार महेंद्रसिंह धोनीने भारतीय चाहत्यांसोबत रंगपंचमीचा आनंद लुटला. 
 
कडेकोट बंदोबस्त असूनही धोनीच्या विनंतीवरुन सुधीर गौतम, राम बाबू आणि अन्य तरुण चाहत्यांना भारतीय संघाच्या बसजवळ  जाण्याची अनुमती देण्यात आली. यावेळी सुधीर, रामबाबू आणि अन्य भारतीय चाहत्यांनी धोनीच्या कपाळावर गुलाल लावला व विजयाच्या शुभेच्छा दिल्या. 
 
सुधीर हा सचिन तेंडुलकरचा निस्सी चाहता तर, राम बाबू महत्वाच्या सामन्यांच्यावेळी भारतीय संघाचा उत्साह वाढवण्यासाठी मैदानावर हजर असतात. भारतात बुधवारी होळी तर, गुरुवारी रंगपंचमीचा सण आहे. स्पर्धेतील आव्हान कायम टिकवण्यासाठी भारताला आजच्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध विजय आवश्यक आहे. भारताच्या आजच्या विजयाने उद्याच्या रंगपंचमीच्या आनंदामध्ये अधिक भर पडणार आहे. 
 

Web Title: Rangpurchimi with Dhoni fans before the match