पावसाचा व्यत्यय; पुणे रायझिंगच्या ६ बाद १०३ धावा

By Admin | Updated: May 14, 2016 22:22 IST2016-05-14T22:18:11+5:302016-05-14T22:22:18+5:30

पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबला तेव्हा १७.४ षटकांत रायझिंग पुणे संघाच्या ६ बाद १०३ धावा झाल्या होत्या. धोनी ८ व आश्विन शून्य धावांवर होते.

Rain interruption; Pune Royals scored 103 runs apiece | पावसाचा व्यत्यय; पुणे रायझिंगच्या ६ बाद १०३ धावा

पावसाचा व्यत्यय; पुणे रायझिंगच्या ६ बाद १०३ धावा

ऑनलाइन लोकमत

कोलकाता : सलामीवीर स्वस्तात गमावल्यानंतर जॉर्ज बेली आणि सौरभ तिवारी यांनी ३१ चेंडूंत ४0 धावांची धावांची भागीदारी करताना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघाचा डाव सावरला. १0 षटकाअखेर रायजिंग पुणे सुपर जायंट्स संघाने ३ बाद ७0 धावा केल्या होत्या. मोक्याच्या वेळी पुण्याच्या फंलदाजांनी हाराकीरी केल्यामुळे डाव कोसळला. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबला तेव्हा १७.४ षटकांत रायझिंग पुणे संघाच्या ६ बाद १०३ धावा झाल्या होत्या. धोनी ८ व आश्विन शून्य धावांवर होते. जॉर्ज बेली २७ चेंडूंत ३ चौकारांसह ३३  आणि इरफान पठाण ८ धावांवर बाद झाले. सलामीवीर अजिंक्य रहाणे ६ चेंडूंत २ आणि उस्मान ख्वाजा १७ चेंडूंत ३ चौकारांसह २१ धावा काढून बाद झाला. तिसऱ्या फलंदाजाच्या रुपात सौरभ तिवारी ११ धावा काढून बाद झाला. कोलकाता नाईट रायडर्सकडून शकीब अल हसन, आंद्रे रसेल आणि अंकित राजपूत यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. तर चावलाने २ फलंदाज तंबूत झाडले.


नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या रायजिंग पुणे सुपरजायंट्स संघाची सुरुवात चांगली झाली नाही. जबरदस्त भरात असणारा अजिंक्य रहाणे तिसऱ्या षटकात आंद्रे रसेलला आॅनसाईडला खेळण्याच्या प्रयत्नात त्रिफळाबाद झाला. त्यानंतर जम बसू पाहणारा उस्मान ख्वाजाही शकीबल अल हसनला उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात सीमारेषेजवळ यादवच्या हाती सोपा झेल देऊन परतल्याने पुणे संघाची स्थिती ४.३ षटकात २ बाद २६ अशी झाली. खराब सुरुवातीमुळे रायजिंग पुणे सुपर जायंट्स संघाला ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये २ फलंदाज गमावून फक्त ३७ पर्यंत मजल मारता आली. 
 

Web Title: Rain interruption; Pune Royals scored 103 runs apiece