शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वेस्ट इंडिज व पाकिस्तानला क्वार्टरफायनलचे तिकीट

By admin | Updated: March 15, 2015 18:12 IST

वेस्ट इंडिज व पाकिस्तानने अनुक्रमे यूएई व आयर्लंडचा पराभव करत वर्ल्डकपच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली.

ऑनलाइन लोकमत 

नेपियर/ अॅडलेड, दि. १५ - वेस्ट इंडिज व पाकिस्तानने अनुक्रमे यूएई व आयर्लंडचा पराभव करत क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली. वेस्ट इंडिजने यूएईचा सहा विकेट्स तर पाकिस्तानने आयर्लंडचा सात गडी राखून पराभव केला.  ब गटात आयर्लंड आणि वेस्ट इंडिजचे गुण समान असले तरी रन रेटच्या आधारे वेस्ट इंडिजला क्वार्टर फायनलमध्ये स्थान पटकावता आले. 

वर्ल्डकपमध्ये ब गटातून भारत व दक्षिण  आफ्रिका हे दोन संघ सुपर एटमध्ये दाखल झाले असले तरी उर्वरित दोन संघ कोण असतील याचा निर्णय आज (रविवारी) होणार होता. पहिली लढत अॅडलेडमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध यूएईमध्ये पार पडली. वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन हॉल्डर व जेरोम टेलरच्या अचुक मा-याने यूएईचा डाव १७५ धावांवर आटोपला. यूएईतर्फे नासिर अझीज ६० धावा व अमजद जावेदच्या ५६ धावांच्या खेळीने यूएईला १७५ धावा करत आल्या. या जोडीने सातव्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी केली. वेस्ट इंडिजतर्फे होल्डरने सर्वाधिक ४ तर टेलरने तीन विकेट घेतल्या. यूएईने दिलेले १७६ धावांचे माफक लक्ष्य विंडीजने ३०.३ षटकांत गाठले. विंडीतर्फे जॉन्सन चार्ल्स ५५ धावा, जोनाथन कार्टर नाबाद ५० धावा आणि दिनेश रामदीनने नाबाद ३३ धावांची खेळी करत विंडीजला विजय मिळवून दिला. 

आज (रविवारी) दुसरी लढत पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड यांच्यात पार पडली. हा सामना पाकिस्तानसाठी महत्त्वाचा होता. आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आयर्लंडची सुरुवात फारशी चांगली नव्हती. सलामीवीर पॉल स्टर्लिंग  ३ धावांवरच माघारी परतला. कर्णधार विलियम पोर्टेरफिल्डने शतक ठोकून आयर्लंडचा डाव पुढे नेला. पण त्याला आयर्लंडच्या उर्वरित फलंदाजांकडून अपेक्षीत साथ मिळाली नाही. पोर्टेरफिल्डने दमदार १०७ धावांची खेळी केली. पाकिस्तानच्या तेजतर्रार मा-याने आयर्लंडचा डाव ५० षटकांत २३७ धावांवर आटोपला. पाकतर्फे वहाब रियाझने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. पाकिस्तानच्या सलामीवीरांना धडाकेबाज सुरुवात करत आयर्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. अहमद शहजादने ६३ तर सरफराज अहमदने नाबाद १०३ धावांची खेळी केली. सरफराजचे वन डे कारकिर्दीतील हे पहिले वहिले शतक ठरले. हॅरिस सोहेल ३ तर कर्णधार मिसबाह उल हकने ३९ धावांची खेळी केली. पाकिस्तानने २३८ धावांचे लक्ष्य ३ गडी गमावत गाठले. शतकवीर सरफराज व उमर अकमल २० धावांवर नाबाद राहिले.  

वेस्ट इंडिजला विजय मिळाला असला तरी पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड या सामन्यावर त्यांचे भवितव्य अवलंबून होते. पाकने आयर्लंडचा पराभव केल्याने वेस्ट इंडिजलाही क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळवता आहे. क्वार्टर फायनलमध्ये वेस्ट इंडिजला सामना न्यूझीलंडशी तर पाकिस्तानचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.