शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
4
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
6
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
7
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
8
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
9
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
10
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
11
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
12
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
13
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
14
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
15
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
16
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
17
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
18
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
19
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
20
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
Daily Top 2Weekly Top 5

भारताची बॅडमिंटन स्टार PV सिंधूनं रचला नवा इतिहास; जे 'फुलराणी'ला जमलं नाही ते तिने करून दाखवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 15:36 IST

बॅडमिंटन जगतात अशी कामगिरी करणारी सहावी महिला खेळाडू

भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू सध्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेतील प्री-क्वार्टर फायनल सामन्यात डेन्मार्कच्या लाइन होजमार्क कजेरफेल्ड हिला सरळ सेटमध्ये पराभूत करत सिंधूनं पुढच्या फेरीत प्रवेश केला. या विजासह तिने नवा इतिहास रचला आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

सिंधूची ऐतिहासिक कामगिरी, जे 'फुलराणी'लाही जमलं नाही ते करुन दाखवलं

इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूची सुरुवात संघर्षपूर्ण राहिली. पहिला सामना जिंकण्यासाठी तिला चांगलीच मेहनत घ्यावी लागली होती. मात्र प्री-क्वार्टर फायनलमध्ये मिळालेला हा विजय सिंधूसाठी ऐतिहासिक ठरला. जे फुलराणी सायना नेहवाल हिला जमलं नाही ते पीव्ही सिंधूनं करून दाखवलं आहे.  पी. व्ही. सिंधूने कारकिर्दीतील ५०० सामने जिंकण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 

मुलगीच झाली, तिचं तोंड नाही पाहणार! सायना नेहवालच्या वाट्यालाही आली होती हेटाळणी, तिनं स्वप्नांना घातली गवसणी

बॅडमिंटन जगतात अशी कामगिरी करणारी सहावी महिला खेळाडू

इंडोनेशिया मास्टर्स सुपर 500 स्पर्धेतील प्री-क्वार्टर फायनलमध्ये सिंधूने अवघ्या ४३ मिनिटांत प्रतिस्पर्धीत खेळाडूचा खेळ खल्लास केला. या लढतीत तिने पहिला सेट २१-१९ आणि दुसरा सेट २१-१८ असा आपल्या नावे करत आपल्या कारकिर्दीत ऐतिहासिक पल्ला गाठला. महिला बॅडमिंटन एकेरीत ५०० सामने जिंकणारी ती बॅडमिंटनच्या कोर्टवरील पहिली महिला खेळाडू ठरली आहे. बॅडमिंटन जगतात असा पराक्रम करणारी ती सहावी महिला खेळाडू आहे.  
 

दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती अन् बरंच काही 

 पी. व्ही. सिंधूनं आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक अविश्वनिय स्पर्धा जिंकून इतिहास रचला आहे. २०१६ मध्ये तिने  रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते. २०२० च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत तिने कांस्य पदकाला गवसणी घेतली होती. ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू आहे. २०१९ मध्ये पी. व्ही. सिंधूनं जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत आपली छाप सोडली होती. ही स्पर्धा जिंकणारी ती भारताची पहिली आणि एकमेव महिला खेळाडू आहे.
 

English
हिंदी सारांश
Web Title : PV Sindhu Makes History at Indonesia Masters, Surpasses Saina Nehwal

Web Summary : PV Sindhu achieved a historic milestone at the Indonesia Masters, winning her 500th career match. She defeated Denmark's Line Hojmark Kjaersfeldt, progressing to the next round. Sindhu is the sixth woman to reach this feat, surpassing Saina Nehwal's record. She holds two Olympic medals and won the 2019 World Championships.
टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadmintonSaina Nehwalसायना नेहवाल