पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीम इंडियाला शुभेच्छा

By Admin | Updated: March 20, 2016 09:37 IST2016-03-20T09:35:41+5:302016-03-20T09:37:29+5:30

आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानवर मिळवलेल्या दणदणीत विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. '

Prime Minister Narendra Modi's team India happy | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीम इंडियाला शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीम इंडियाला शुभेच्छा

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २० -  आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानवर मिळवलेल्या दणदणीत विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. 'पाकिस्तानवर मिळवलेल्या अदभूत विजयाबद्दल टीम इंडिया तुमचे अभिनंदन' असे टि्वट पंतप्रधानांनी केले आहे. 
 
विराट कोहली आणि युवराज सिंगच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर सहा गडी राखून मोठा विजय मिळवला. इडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणा-या भारताने पाकिस्ताला ११८ धावांवर रोखले. 
 
त्यानंतर १५.५ षटकात अगदी सहजपणे पाकिस्तानचे हे आव्हान पार केले. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना वीस ऐवजी १८ षटकांचा खेळवण्यात आला. 

Web Title: Prime Minister Narendra Modi's team India happy