विश्वचषक उद्घाटनाला दिग्गजांची उपस्थिती

By Admin | Updated: February 3, 2015 01:19 IST2015-02-03T01:19:40+5:302015-02-03T01:19:40+5:30

जेसिका माउबाय, टिना अरेना, नथानियेल आणि डॅरिल ब्रेथवेट हे आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला सिम्फनी आॅर्क$ेस्ट्रासह उपस्थित राहणार आहेत.

The presence of veterans in the World Cup inauguration | विश्वचषक उद्घाटनाला दिग्गजांची उपस्थिती

विश्वचषक उद्घाटनाला दिग्गजांची उपस्थिती

मेलबर्न : आॅस्ट्रेलियातील दिग्गज कलाकार जेसिका माउबाय, टिना अरेना, नथानियेल आणि डॅरिल ब्रेथवेट हे आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला सिम्फनी आॅर्क$ेस्ट्रासह उपस्थित राहणार आहेत. व्हिक्टोरियाचे पर्यटनमंत्री जॉन एरेन यांनी याची घोषणा केली. हा उद्घाटन सोहळा १२ फेब्रुवारीला होणार असून, स्पर्धेतील पहिली लढत १४ तारखेला आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. एरेन म्हणाले, ‘‘आयसीसी क्रिकेट विश्वचषक २३ वर्षांनंतर आॅस्ट्रेलियात होत आहे आणि मेलबर्नमध्ये त्याचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी सज्ज आहोत.’’
आयसीसीचे मुख्य कार्यकारी जॉन हर्नडेन म्हणाले, ‘‘या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी व्हिक्टोरिया सरकारसह काम करण्याचा अनुभव सुखद होता. उद्घाटन समारोपाचे तिकीट हातोहात विकले गेले.’’ (वृत्तसंस्था)

Web Title: The presence of veterans in the World Cup inauguration