शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

प्रणय, श्रीकांत विजयी

By admin | Updated: June 16, 2017 03:59 IST

भारताच्या एच.एस. प्रणयने जगातील पहिल्या क्रमांकाचा खेळाडू मलेशियाच्या ली चोंग वेईला सरळ गेममध्ये पराभूत करत इंडोनेशिया सुपर सीरिज प्रीमियर बॅडमिंटन

जकार्ता : भारताच्या एच.एस. प्रणयने जगातील पहिल्या क्रमांकाचा खेळाडू मलेशियाच्या ली चोंग वेईला सरळ गेममध्ये पराभूत करत इंडोनेशिया सुपर सीरिज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तर किदाम्बी श्रीकांत याने चौथा मानांकित खेळाडू डेन्मार्कचा यान ओ योर्गेसनचा पराभव केला. जगातील २५ व्या क्रमांकाचा खेळाडू एच.एस.प्रणय याला वेई विरोधातील या आधीच्या दोन्ही लढतीत पराभव पत्करावा लागला होता. त्याने तीन वेळच्या आॅलिम्पिक रौप्यपदक विजेत्या वेईला ४० मिनिटात २१-१०, २१-१८ असे पराभूत केले. श्रीकांत याने योर्गेसनला २१ -१५, २०-२२, २१ -१६ ने पराभूत करत अंतिम आठ खेळाडूंमध्ये जागा मिळवली आहे. प्रणय चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्याने पहिल्या गेममध्ये ६-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर आपली आघाडी १०-३ अशी वाढवली. ब्रेकनंतर ही बढत कायम ठेवली. त्याने दुसऱ्या गेममध्ये १०-६ अशी आघाडी घेतली. मात्र ली याने सलग गुण मिळवत १३ -१२ अशी स्थिती निर्माण केली. मात्र प्रणय याने १७-१४ अशी आघाडी घेत ली याला अडचणीत आणले. मात्र ली याने हा स्कोअर बरोबरीत आणला. अखेरीस प्रणय याने हा गेम जिंकत विजय मिळवला. त्यासोबतच ली याचे विक्रमी सातवे विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न भंगले. प्रणयचा पुढचा सामना आॅलिम्पिक विजेत्या चीनच्या चेन लोंगसोबत होईल. तर श्रीकांतचा सामना तैवानच्या झु वेइ वांग आणि एंग का लोंग याच्यातील विजेत्यासोबत होईल. (वृत्तसंस्था)- जगातील २२ व्या क्रमांकाचा खेळाडू किदाम्बी श्रीकांत याने नववे रँकिंग असलेल्या योर्गेसन याला पराभूत केले. या आधी रियो आॅलिम्पिक स्पर्धेत दोघांची लढत झाली होती. पहिला गेम स्कोअर १० -१० असा होता. त्यानंतर श्रीकांत याने १७-१५ अशी आघाडी घेतली आणि गेम जिंकला. दुसरा गेम जिंकत योर्गेसन याने बरोबरी साधली. मात्र निर्णायक गेममध्ये श्रीकांतने पुनरागमन करत विजय मिळवला.