बॉक्सिंग महासंघाची निवडणूक पुढे ढकलली

By Admin | Updated: May 12, 2016 20:15 IST2016-05-12T20:15:49+5:302016-05-12T20:15:49+5:30

आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या निवडणुकीची पुरेशी तयारी करण्यासाठी वेळ वाढवून दिल्याने दिलासा

Postponed the election of the boxing federation | बॉक्सिंग महासंघाची निवडणूक पुढे ढकलली

बॉक्सिंग महासंघाची निवडणूक पुढे ढकलली

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12- भारतीय बॉक्सर्सना आता रिओ आॅलिम्पिकमध्ये निर्धास्तपणे भाग घेता येईल. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या निवडणुकीची पुरेशी तयारी करण्यासाठी वेळ वाढवून दिल्याने भारतीय बॉक्सिंग महासंघाला दिलासा मिळाला आहे. भारतीय बॉक्सिंग महासंघ संस्था म्हणून पंजीबद्ध होण्याच्या तयारीत आहे.
एआयबीएने आधी भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या स्थानपनेसाठी १४ मेपर्यंतची वेळ दिली होती; पण येणाऱ्या अडथळ्यांचा विचार करता या तारखेत वाढ करण्यास तत्त्वत: मान्यता प्रदान केली.
बॉक्सिंग महासंघाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार महासंघाच्या स्थापनेच्या कामाची प्रगती पाहता वेळ वाढवून दिली. नवी डेडलाइन मिळालेली नाही; पण आमच्या खेळाडूंना आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्यापासून रोखले जाणार नाही, असे आश्वस्त केले आहे. नव्या महासंघात ३६ पैकी ३५ राज्य संघटना सहभागी होण्यास अनुकूल असल्याने भारतीय महासंघाच्या काम करण्याच्या पद्धतीवर आम्ही समाधानी आहोत, असे एआयबीएने स्पष्ट केले.

बॉक्सिंग महासंघ डेडलाईनवर

एआयबीएने आधीच्या वक्तव्यात १४ मे पर्यंत बॉक्सिंग महासंघ स्थापन न झाल्यास भारतीय खेळाडू रिओमध्ये खेळू शकणार नाहीत, असा इशारा दिला होता. आतापर्यंत शिवा थापा ५६ किलो हा एकच भारतीय बॉक्सर रिओसाठी पात्र ठरला आहे. दोन पात्रता स्पर्धा अद्याप शिल्लक आहेत.
दरम्यान बॉक्सिंग महासंघाच्या निवडणुकीची नोटीस २१ दिवसांपूर्वीच निघाली. या महिनाअखेर निवडणूक होईल. बॉक्सिंग फेडरेशनच्या स्थापनेत राष्ट्रीय क्रीडा संहितेचे तंतोतंत पालन करण्यात येणार आहे.

Web Title: Postponed the election of the boxing federation