शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बॉक्सिंग महासंघाची निवडणूक पुढे ढकलली

By admin | Updated: May 13, 2016 03:22 IST

भारतीय बॉक्सर्सना आता रिओ आॅलिम्पिकमध्ये निर्धास्तपणे भाग घेता येईल. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या निवडणुकीची पुरेशी तयारी करण्यासाठी वेळ वाढवून दिल्याने दिलासा मिळाला

नवी दिल्ली : भारतीय बॉक्सर्सना आता रिओ आॅलिम्पिकमध्ये निर्धास्तपणे भाग घेता येईल. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या निवडणुकीची पुरेशी तयारी करण्यासाठी वेळ वाढवून दिल्याने दिलासा मिळाला. भारतीय बॉक्सिंग महासंघ संस्था म्हणून पंजीबद्ध होण्याच्या तयारीत आहे. एआयबीएने आधी भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या स्थानपनेसाठी १४ मेपर्यंतची वेळ दिली होती; पण येणाऱ्या अडथळ्यांचा विचार करता या तारखेत वाढ करण्यास तत्त्वत: मान्यता प्रदान केली. बॉक्सिंग महासंघाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार महासंघाच्या स्थापनेच्या कामाची प्रगती पाहता वेळ वाढवून दिली. नवी डेडलाइन मिळालेली नाही; पण आमच्या खेळाडूंना आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्यापासून रोखले जाणार नाही, असे आश्वस्त केले आहे. नव्या महासंघात ३६ पैकी ३५ राज्य संघटना सहभागी होण्यास अनुकूल असल्याने भारतीय महासंघाच्या काम करण्याच्या पद्धतीवर आम्ही समाधानी आहोत, असे एआयबीएने स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)> बॉक्सिंग महासंघ डेडलाईन : एआयबीएने आधीच्या वक्तव्यात १४ मेपर्यंत बॉक्सिंग महासंघ स्थापन न झाल्यास भारतीय खेळाडू रिओमध्ये खेळू शकणार नाहीत, असा इशारा दिला होता. आतापर्यंत शिवा थापा (५६ किलो) हा एकच भारतीय बॉक्सर रिओसाठी पात्र ठरला आहे. दोन पात्रता स्पर्धा अद्याप शिल्लक आहेत. दरम्यान, बॉक्सिंग महासंघाच्या निवडणुकीची नोटीस २१ दिवसांपूर्वीच निघाली. या महिनाअखेर निवडणूक होईल. बॉक्सिंग फेडरेशनच्या स्थापनेत राष्ट्रीय क्रीडा संहितेचे तंतोतंत पालन करण्यात येणार आहे.