"लोकांना खेळाडूंपेक्षा इन्स्टाग्राम मॉडेल्समध्ये जास्त रस" भारतीय खेळाडूनं व्यक्त केली खंत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 14:52 IST2026-05-07T14:48:23+5:302026-05-07T14:52:55+5:30

Satwiksairaj Rankireddy: भारतीय बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रंकीरेड्डी याने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना मिळणारी वागणूक आणि सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर यांना मिळणारी प्रसिद्धी यातील तफावत त्याने स्पष्टपणे मांडली. 

"People are more interested in Instagram models than athletes," Indian athlete Satwiksairaj Rankireddy expresses regret | "लोकांना खेळाडूंपेक्षा इन्स्टाग्राम मॉडेल्समध्ये जास्त रस" भारतीय खेळाडूनं व्यक्त केली खंत!

"लोकांना खेळाडूंपेक्षा इन्स्टाग्राम मॉडेल्समध्ये जास्त रस" भारतीय खेळाडूनं व्यक्त केली खंत!

भारतीय बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रंकीरेड्डी याने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना मिळणारी वागणूक आणि सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर यांना मिळणारी प्रसिद्धी यातील तफावत त्याने स्पष्टपणे मांडली. "आम्ही देशासाठी रात्रंदिवस मेहनत करतो, आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळवतो, पण तरीही आम्हाला म्हणावे तसा सन्मान मिळत नाही. दुसरीकडे, काही सेकंदांचे रील्स बनवणाऱ्या इन्स्टाग्राम मॉडेल्सना लोकांकडून अधिक प्रेम आणि प्रसिद्धी मिळते, ही खेदाची बाब आहे", असे सात्विकसाईराजने म्हटले आहे.

सात्विकच्या म्हणाला की, "भारतीय खेळाडू देशासाठी रात्रंदिवस मेहनत करतात, घाम गाळतात आणि जागतिक स्तरावर पदके जिंकतात. तरीही, समाजाकडून आणि व्यवस्थेकडून त्यांना म्हणावी तशी ओळख मिळत नाही, सन्मान मिळत नाही. याउलट, अवघ्या काही सेकंदांचे रील्स बनवणाऱ्या इन्स्टाग्राम मॉडेल्सना अधिक प्रेम, प्रसिद्धी आणि महत्त्व दिले जाते, ही वस्तुस्थिती खेदजनक आहे."

दरम्यान, २०२२ मध्ये भारताने थॉमस कपमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले, ज्यात सात्विक आणि चिराग शेट्टीची अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. "नुकत्याच झालेल्या थॉमस कपमध्ये भारतीय संघाने चीनचा पराभव करून कांस्यपदक मिळवले. मात्र, मायदेशात परतल्यानंतर या यशाची साधी दखलही घेतली गेली नाही. आम्ही भारतात परतलो, पण गेल्या दोन आठवड्यात काय घडले, हे कोणालाही ठाऊक नव्हते", असे सात्विकने भावूक होऊन सांगितले.

सात्विक पुढे म्हणाले की, "विमानतळावर उतरल्यानंतर इमिग्रेशनपासून विमानापर्यंत कोणालाही आपण भारतीय बॅडमिंटन संघ आहोत, याची कल्पना नव्हती किंवा कोणालाही त्याचे देणेघेणे नव्हते. हे अत्यंत हृदयद्रावक आहे. आम्हाला पैसा नको. आम्हाला फक्त सन्मान हवा आहे. खेळाडूंना केवळ थोड्याशा कौतुकाची अपेक्षा असते. आम्हाला फक्त एवढेच हवे आहे की, कोणीतरी आम्हाला म्हणावे, 'आम्ही तुमचा सामना पाहिला, तुम्ही खूपच छान खेळलात, एवढेच आमच्यासाठी पुरेसे आहे."

Web Title : भारतीय खिलाड़ी का दुख: एथलीटों से ज्यादा इंस्टाग्राम मॉडल्स में दिलचस्पी

Web Summary : बैडमिंटन खिलाड़ी सात्विकसाईराज रंकीरेड्डी ने खिलाड़ियों के लिए मान्यता की कमी पर निराशा व्यक्त की. उन्होंने पदक जीतने वाले खिलाड़ियों की कड़ी मेहनत और इंस्टाग्राम मॉडल की लोकप्रियता के बीच असमानता को उजागर किया. थॉमस कप जीतने के बाद भी कोई पहचान नहीं मिली.

Web Title : Indian Player Lament: More Interest in Instagram Models Than Athletes

Web Summary : Badminton player Satwiksairaj Rankireddy expressed disappointment over the lack of recognition for athletes. He highlighted the disparity between the hard work of players winning medals and the popularity of Instagram models. He noted a lack of acknowledgement even after winning the Thomas Cup.

टॅग्स :BadmintonBadminton