शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान अंतिम फेरीत

By admin | Updated: June 15, 2017 04:07 IST

पाकिस्तानने गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या बळावर इंग्लंडला आठ गड्यांनी पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

कार्डिफ : पाकिस्तानने गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या बळावर इंग्लंडला आठ गड्यांनी पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना दिलेले २११ धावांचे माफक आव्हान पाकिस्तानने ८ गडी आणि तब्बल ७७ चेंडू राखून पूर्ण केले. या विजयाचा शिल्पकार ठरला जलदगती गोलंदाज हसन अली. त्यासोबतच अजहर अली आणि फखर झमन यांच्या शतकी भागिदारीमुळे पाकिस्तानने दमदार विजय मिळवला.कार्डिफ मैदानावर पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हा निर्णय पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी सार्थ ठरवला. इंग्लंडने पहिला गडी सलामीवीर अलेक्स हेल्सच्या रूपाने ३४ धावांवरच गमावला. त्याला पदार्पण करणाऱ्या रुम्मान रईस याने बाद केले. तर जेसन रॉयच्या जागी संधी मिळालेल्या जॉनी बेअरस्टो याने ४३ धावा केल्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या बेअरस्टोला अनुभवी हसन अलीने मोहम्मद हाफीजकडे झेल देण्यास भाग पाडले. इंग्लंडचा मिस्टर डिपेंडेबल जो रुट याला ४६ धावांवर असताना शादाब खान याने बाद करत इंग्लंडला धक्का दिला. पाकिस्तानकडून पदार्पण करणाऱ्या रुम्मान रईस याने अनुभवी गोलंदाज मोहम्मद आमीरची उणीव जाणवू दिली नाही. त्याने हेल्ससोबतच लियाम प्लंकेटलादेखील बाद केले. जुनैद खान यानेदेखील ४२ धावा देत दोन गडी बाद केले. तर हसन अली पाकिस्तानचा सर्वात लाभदायी गोलंदाज ठरला. त्याने ३५ धावात देत ३ गडी बाद करत इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडेच मोडले. त्यानेच बेअरस्टो, कर्णधार मॉर्गन, बेन स्टोक्स यांना बाद केले. पाकिस्तानचे सलामीवीर अजहर अली आणि फखर झमन यांनी ११८ धावांची भागीदारी केली. झमन याने ८९ चेंडूत दमदार ५७ धावा केल्या. तर अजहर अली याने ७६ धावांची खेळी केली. हे दोन्ही खेळाडू बाद झाल्यावर पाकिस्तानच्या विजयाची औपचारिकता बाबर आझम आणि मोहम्मद हाफीज यांनी पूर्ण केली. (वृत्तसंस्था)धावफलकइंग्लंड : जॉनी बेअरस्टो झे. मोहम्मद हाफीज गो. हसन अली ४३, अ‍ॅलेक्स हेल्स झे. बाबर आझम गो. रुम्मान रईस १३, जो रुट झे. सर्फराज अहमद गो. शादाब खान ४६, इयॉन मॉर्गन झे. सर्फराज अहमद, गो. हसन अली ३३, बेन स्टोक्स झे. मोहम्मद हाफीज गो. हसन अली ३४, जोश बटलर झे. सर्फराज अहमद गो. जुनैद खान ४, मोईन अली झे. फखर झमन गो. जुनैद खान ११, आदिल रशीद धावबाद अहमद शेहजाद ७, लियाम प्लंकेट झे. अजहर अली गो. रुम्मान रईस ९, मार्क वुड धावबाद सर्फराज अहमद ३, जॅक बॉल नाबाद २ अंवातर ६, एकूण धावसंख्या ४९.१ षटकांत सर्वबाद २११, गोलंदाजी : जुनैद खान ८.५- ०-४२-२, रुम्मान रईस ९-०-४४-२, इमाद वसीम ५-०-१६-०, शादाब खान ९-०-४०-१, हसन अली १०-०-३५- ३, मोहम्मद हाफीज ८-०-३३-०पाकिस्तान : अजहर अली गो. जॅक बॉल ७६, फखर झमन बटलर गो. राशिद ५७, बाबर आझम नाबाद ३८, मोहम्मद हाफीज ३१, अवांतर १३, एकूण ३७.१ षटकांत २ बाद २१५गोलंदाजी : मार्क वुड ८-१-३७-०, जॅक बॉल ८-०-३७-१, बेन स्टोंक्स ३-१-०-३८-०, लियाम प्लंकेट ६-०-३३-०, आदिल राशिद १०-०-५४-१, मोईन अली २-०-१५-०