पेस-क्लासेन अंतिम तर वावरिंका उपांत्य फेरीत

By Admin | Updated: January 10, 2015 01:21 IST2015-01-10T01:21:03+5:302015-01-10T01:21:03+5:30

कारेनो पूस्ता व क्वीलेरमो गार्सिया लोपेज या जोडीचा सरळ दोन सेटमध्ये सहज पराभव करून चेन्नई ओपन एटीपी टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

Paes-Klassen finishes in Wawrinka semifinals | पेस-क्लासेन अंतिम तर वावरिंका उपांत्य फेरीत

पेस-क्लासेन अंतिम तर वावरिंका उपांत्य फेरीत

चेन्नई : भारताचा लिएंडर पेस आणि दक्षिण आफ्रिकेचा त्याचा जोडीदार रावेन क्लासेन यांनी पुरुष दुहेरीत स्पनेचा पाब्लो कारेनो पूस्ता व क्वीलेरमो गार्सिया लोपेज या जोडीचा सरळ दोन सेटमध्ये सहज पराभव करून चेन्नई ओपन एटीपी टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. एकेरीमध्ये गतविजेता स्वित्झर्लंडचा स्टेनिसलासने जॉइल्स मुलेरचा पराभव करून उपांत्य फेरीतील आपली जागा निश्चित केली.
अग्रमानांकित पेस-क्लासेन जोडीने स्पेनच्या पूस्ता आणि लोपेज या जोडीविरुद्ध सुरुवातीपासूनच उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून ५८ मिनिटांत ६-३, ६-३ असा पराभव केला.एकेरीमध्ये अग्रमानांकित वावरिंकाने १ तास २५ मिनिटे चालेल्या लढतीत मुलेरला ६-२, ७-६ असे नमविले. (वृत्तसंस्था)

Web Title: Paes-Klassen finishes in Wawrinka semifinals