शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

पी. व्ही. सिंधूला जेतेपदाची संधी, स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीत होणार स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 3:09 AM

सिंधूला स्विस ओपनच्या फायनलमध्ये स्पेनची कॅरोलिना मारिनकडून एकतर्फी पराभव पत्करावा लागला. तीन वेळेची विश्वचॅम्पियन मारिन जखमी असल्याने ऑल इंग्लंडमध्ये खेळणार नाही.

बर्मिंगहॅम : स्विस ओपनच्या अंतिम सामन्यात झालेला पराभव विसरून स्टार पी.व्ही. सिंधू बुधवारी सुरू होत असलेल्या ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत जेतेपद मिळविण्याच्या निर्धाराने खेळेल. (P. V. Sindhu has a chance to win the title, the tournament will be absent for star players)

सिंधूला स्विस ओपनच्या फायनलमध्ये स्पेनची कॅरोलिना मारिनकडून एकतर्फी पराभव पत्करावा लागला. तीन वेळेची विश्वचॅम्पियन मारिन जखमी असल्याने ऑल इंग्लंडमध्ये खेळणार नाही. याशिवाय चीन, कोरिया व चायनीज तायपेईचे खेळाडूही या स्पर्धेत खेळणार नाहीत.  ही स्पर्धा टोकियो ऑलिम्पिकची पात्रता स्पर्धा नसूनही भारताने १९ सदस्यांचे पथक निवडले आहे.

भारताकडून १९८० ला प्रकाश पदुकोण व त्यानंतर २००१ ला पुल्लेला गोपीचंद यांचा वपवाद वगळता कुणीही ही स्पर्धा जिंकू शकले नाही. सायना नेहवाल हिने २०१५ ला उपविजेतेपदावर समाधान मानले होते. सिंधूने २०१८ ला या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती.  सायना मात्र सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये नाही. मागच्या सामन्यांत ती उपांत्यपूर्व फेरीही गाठू शकली नव्हती. अन्य खेळाडूंमध्ये किदाम्बी श्रीकांत आणि दुहेरीत सात्त्विक साईराज रंकिरेड्डी, तसेच चिराग शेट्टी यांनी स्विस ओपनमध्ये चांगली कामगिरी केली होती. येथेही त्यांच्याकडून अपेक्षा असतील.

ऑल इंग्लंड बॅडमिंटनपाचवी मानांकित सिंधूचा सलामीचा सामना मलेशियाची सोनिया चियाविरुद्ध होईल. उपांत्यपूर्व लढतीत ती जपानची अकाने यामागुचीविरुद्ध खेळू शकेल. सायना सलामीला सातवी मानांकित डेन्मार्कची मिया ब्लिचफेल्टविरुद्ध लढेल. 

श्रीकांत, कश्यपवर नजर - श्रीकांतला इंडोनेशियाचा टॉमी सुगियार्तोविरुद्ध खेळायचे आहे. बी. साईप्रणीत फ्रान्सचा तोमा ज्युनिअर पोपोवविरुद्ध खेळेल. - पुढच्या फेरीत त्याला व्हिक्टर एक्सलसेनचा सामना करावा लागू शकतो. एक्सलसेनने अलीकडे स्विस व थायलंड स्पर्धा जिंकली. पारुपल्ली कश्यप सलामीला जपानच्या केंटो मोमोताविरुद्ध खेळेल. एच. एस. प्रणय मलेशियाचा डारेन लियूविरुद्ध लढेल.