शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

फक्त सायनाच जिंकली

By admin | Updated: May 29, 2015 01:45 IST

स्टार बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल वगळता आॅस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीजमध्ये सर्व भारतीय खेळाडूंना पराभवाला सामोरे जावे लागले.

सिडनी : स्टार बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल वगळता आॅस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीजमध्ये सर्व भारतीय खेळाडूंना पराभवाला सामोरे जावे लागले. जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू सायना हिने चीनच्या नवव्या मानांकित सुन यू हिचा १ तास १८ मिनिटांपर्यंत रंगलेल्या लढतीत २१-१९, १९-२१, २१-१४ असे पराभूत केले.गेल्या चारपैकी तीन लढतींत सुन हिला पराभूत करणाऱ्या सायनाने ब्रेकपर्यंत ११-६ अशी आघाडी घेतली होती; परंतु सुन हिने लवकरच मुसंडी मारताना स्कोअर १८-१८ असा केला. सायना दुसऱ्याच गेममध्ये जिंकली असती. कारण, तिने १३-७ अशी ६ गुणांची आघाडी घेतली होती; परंतु सुन हिने मुसंडी मारताना १३-१३ अशी बरोबरी साधली.सायनाने पुन्हा १८-१५ अशी आघाडी घेतली; परंतु सुन हिने तीन गुण घेताना पुन्हा अंतर १८-१९ असे केले. निर्णायक गेममध्ये सायनाने सुन हिला मुसंडी मारण्याची संधी दिली नाही आणि लवकरच १२-४ अशी आघाडी घेतली. सुनने खूप प्रयत्न केला; परंतु सायनाने या वेळस कोणतीही संधी न देता विजय मिळवला.जागतिक क्रमवारीतील चौथा मानांकित खेळाडू श्रीकांत आणि २0१0 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील चॅम्पियन जोडी ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांचे आव्हान संपुष्टात आले.चौथ्या मानांकित प्राप्त श्रीकांत चीनच्या तियान हुवेई याच्याकडून २१-१८, १८-१७, १३-२१ असा पराभूत झाला, तर चौथ्या मानांकित ज्वाला आणि अश्विनी या जोडीला महिला दुहेरीत इंडोनेशियाच्या नित्या के. माहेश्वरी आणि ग्रेसिया पोली यांनी २१-१४, २१-१0 असे नमवले. (वृत्तसंस्था)आॅलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाची लढत आता दोन वेळेसची आॅल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियन शिजियान वाँग हिच्याशी होईल. तिचे सायनाविरुद्ध ११ लढतींत विजय-पराभवाचे रेकॉर्ड ६-५ असे आहे.