शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या २५ व्या वर्षी ऑलिंपिक चॅम्पियननं घेतला संन्यास; एरियार्नच्या निर्णयानं चाहते हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 11:25 IST

एरियार्न टिटमसने मागील वर्षी झालेल्या पॅरिस ऑलिंपिक २०२४ मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती

जगातील सर्वात यशस्वी जलतरणपटूंपैकी एक असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या एरियार्न टिटमसने अवघ्या २५ व्या वर्षी निवृत्तीचा निर्णय घेतल्याने चाहते हैराण झाले आहेत. चार वेळा एरियार्नने ऑलिंपिक स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावले होते. तिने गुरुवारी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तिच्या निवृत्तीची घोषणा केली. आयुष्यात पोहण्यापेक्षाही इतर महत्त्वाच्या गोष्टी आहेत असं तिने व्हिडिओत म्हटलं आहे.

अचानक का घेतला निर्णय?

टिटमसने सांगितले की, मला कायम पोहण्यास खूप रस होता. लहानपणापासून माझे ते स्वप्न आणि आवड राहिली आहे. परंतु आता मी काही काळ जेव्हा या गोष्टीपासून दूर राहिले तेव्हा आयुष्यात आणखीही खूप काही असल्याचं जाणवते. जे माझ्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचे आहे असं तिने म्हटलं. एरियार्ननं घेतलेल्या निर्णयाने चाहत्यांना आश्चर्यचकीत केले आहे. 

पॅरिस ऑलिंपिकमध्ये रचला इतिहास

एरियार्न टिटमसने मागील वर्षी झालेल्या पॅरिस ऑलिंपिक २०२४ मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. तिने ४०० मीटर फ्री स्टाइलमध्ये अमेरिकन दिग्गज खेळाडू केटी लेडेकी आणि कॅनडाच्या समर मॅकिन्टोशवर मात करत गोल्ड मेडल पटकावले होते. विशेष म्हणजे यावेळी तिने नवीन विश्व रेकॉर्डही बनवला होता. एरियार्न टिटमसच्या नावावर एकूण ३३ आंतरराष्ट्रीय पदके आहेत. त्यात ४ ऑलिंपिक गोल्ड, ३ रौप्य पदके आणि एक कांस्य पदक जिंकले आहे. तसेच चार जागतिक जेतेपदेही तिच्या नावावर आहे.  तिने केवळ तिच्या देशाच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत तर आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला जलतरणात एक नवीन बेंचमार्क देखील स्थापित केला होता. 

दरम्यान, एरियार्न टिटमसचे प्रशिक्षक आणि चाहत्यांना तिच्याकडून खूप अपेक्षा आहे. २०२८ मध्ये लॉस एंजेलिस ऑलिंपिक स्पर्धेत एरियार्न पुन्हा खेळात परतेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. परंतु एरियार्नच्या बोलण्यावरून तिने आता नवीन मार्ग निवडल्याचे दिसून येते. २५ व्या वर्षी निवृत्ती घेण्याचा निर्णय सोपा नव्हता परंतु आयुष्यातील नवीन इनिंग खेळण्यासाठी ती उत्सुक आहे असं तिच्या व्हिडिओतून तिने म्हटलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Olympic Champion Ariarne Titmus Retires at 25, Fans Shocked

Web Summary : Australian swimming star Ariarne Titmus, a four-time Olympic gold medalist, has announced her retirement at just 25. Citing other life priorities, Titmus leaves behind a legacy of 33 international medals, including multiple Olympic and World Championship titles. Fans hope for a future comeback.
टॅग्स :SwimmingपोहणेOlympicsऑलिंपिक