शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

नोवाक जोकोविचनं पहिल्यांदाच जिंकलं फ्रेंच ओपन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2016 23:38 IST

जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने पहिल्यांदाच फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत किताब जिंकला आहे. त्याने प्रतिस्पर्धी अँडी मरेचा ४ सेटमध्ये पराभव केला.

ऑनलाइन लोकमत
पॅरीस, दि. ५ : जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने पहिल्यांदाच फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत  किताब जिंकला आहे. त्याने प्रतिस्पर्धी अँडी मरेचा ४ सेटमध्ये पराभव केला. ११ ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेतील विजेता जोकोविच प्रथमच फ्रेंच ओपनमध्ये चॅम्पियन ठरला आहे. त्याने मरेचा 3-6, 6-1, 6-2, 6-4 अश्या चार सेट पराभव केला. 
 
जोकोविच सहा वेळेसचा ऑस्ट्रेलियन ओपन, तीन वेळेस विम्बल्डन आणि दोन वेळेस यूएस ओपनमध्ये विजेतेपद पटकावले आहे; परंतु फ्रेंच ओपनमध्ये त्याला २0११, २0१४ आणि २0१५ ला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. 
 
गेल्या दोन वर्षांपासून नोव्हाक फायनलमध्ये पराभूत होत होता. 2012 सालीही त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यंदा मात्र त्याने आपला कट्टर प्रतिस्पर्धी मरेचे आव्हान तीन तासांत संपुष्टात आणले.
 
 
जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर असलेल्या अँडी मरेने उपांत्य सामन्यात गतविजेत्या स्वित्झर्लंडच्या स्टेनिसलास वावरिंकाला ६-४, ६-२, ४-६, ६-२ असा धक्का देत अंतिम फेरी गाठली होती. पण फ्रेंच ओपनचे पहिले आणि कारकीर्दीतील तिसरे ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याचे मरेचे स्वप्न नोव्हाकच्या वेगवान खेळासमोर भंगले.