शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

बांगरसोबत अपशब्दांचा वापर नाही- प्रीती झिंटा

By admin | Updated: May 12, 2016 21:16 IST

प्रीती झिंटा यांनी सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून एका धावेने सामना गमावल्यानंतर बांगरसोबत अपशब्दाचा वापर केल्याच्या वृत्ताचे खंडन केले

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 12- किंग्ज इलेव्हन पंजाबच्या सहमालकीण प्रीती झिंटा यांनी सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून एका धावेने सामना गमावल्यानंतर बांगरसोबत अपशब्दाचा वापर केल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे.प्रीती झिंटा यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर सामना गमावल्यानंतर संजय बांगरला अपशब्दांचा वापर केल्याच्या वृत्ताचे खंडण केले. सामन्यानंतर मी संघाचे मेंटर वीरेंद्र सेहवाग आणि संजय बांगर यांच्याशी फक्त चर्चा केली. त्यानंतर मी विजयी संघाचा कर्णधार विराट कोहलीचे अभिनंदनही केले. मी आमच्या प्रशिक्षकाबद्दल कोणत्याही अवमानजनक शब्दांचा वापर केला नाही. मी कोणाबाबतही असे शब्द बोलू शकत नाही. मीडियामध्ये आलेले वृत्त चुकीचे व अतिशयोक्तपूर्ण असल्याचे त्यांनी म्हटले.प्रीती झिंटा म्हणाल्या की, ‘‘मी या नकारत्मकता आणि बकवासामुळे त्रस्त झाली आहे. काही पत्रकार वेळोवेळी चुकीचे लिहितात आणि सेलिब्रिटीज त्यांच्या निशाण्यावर असतात.’’दुसरीकडे पंजाबचे प्रशिक्षक संजय बांगर यांनीदेखील ९ मे रोजी मोहालीत रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून एका धावेने पराभूत झाल्यानंतर प्रीती झिंटा यांनी अपशब्द वापरल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे.बांगर यांनी आपल्या फेसबुकवर लिहिले की, ‘आरसीबीविरुद्ध एका धावेने पराभव पत्करावा लागल्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबच्या मालकांसोबत चर्चा होत होती. काही मीडियांनी याला वेगळे वळण दिले. चुरशीच्या सामन्यातील पराभवाने दु:ख होते; परंतु संघ चांगला खेळत आहे. मला कोणीही अपशब्द वापरले नाहीत. पंजाबचा संघ स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी झुंजार कामगिरी करीत राहील.’’अपशब्दाविषयी तक्रार नाही : शुक्लाकिंग्ज इलेव्हन पंजाबची सहमालकीण प्रीती झिंटा आणि प्रशिक्षक संजय बांगर यांच्यात कथितरूपाने अपशब्दाचा वापर होण्याविषयीच्या वादाविषयी कोणतीही तक्रार आली नसल्याचे आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी सांगितले.याविषयी दोन्ही बाजूंकडून कोणतीही तक्रार आली नसून याबाबत काही माहिती नसल्याचेही शुक्ला यांनी सांगितले. किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ एका धावेने पराभूत झाल्यानंतर प्रीती झिंटा यांनी संजय बांगर यांना कथितरूपाने अपशब्दांचा उपयोग केल्याचे बोलले जात होते. याविषयी पत्रकारांनी शुक्ला यांना प्रश्न विचारला. याविषयी शुक्ला यांनी, संजय बांगर याने अपशब्दांचा उपयोग केल्याविषयी तक्रार केली नाही आणि प्रीती झिंटा यांनीही बांगरविषयी तक्रार केली नाही. त्यामुळे याविषयी काहीच माहिती नसल्यावर काय प्रतिक्रिया देणार, असे सांगितले.