शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत रंगणार राष्ट्रीय रग्बीचा थरार

By admin | Updated: October 18, 2016 06:16 IST

येथे २० व २१ आॅक्टोबर दरम्यान राष्ट्रीय ज्यूनिअर रग्बीचा थरार रंगणार

मुंबई : येथे २० व २१ आॅक्टोबर दरम्यान राष्ट्रीय ज्यूनिअर रग्बीचा थरार रंगणार असून १८ वर्षांखालील मुलांच्या व मुलींच्या गटात होणाऱ्या या स्पर्धेची सोमवारी मुंबईत घोषणा करण्यात आली. बॉम्बे जिमखाना येथे होणाऱ्या या सामन्यात मुलांच्या गटात १८ संघांचा समावेश असून मुलींच्या गटात १२ संघांचा सहभाग आहे. दोन दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेचे सामने साखळी आणि बाद फेरीने खेळविण्यात येतील.विशेष म्हणजे, गतवर्षी भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियममध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत एकूण १३ संघांचा समावेश होता. यंदा मात्र सहभागी संघांची संख्या वाढली आहे. मुलांच्या गटात पश्चिम बंगाल तर मुलींच्या गटात ओडिसा संघ विजेतेपद राखण्याच्या निर्धाराने खेळतील. त्याचवेळी यजमान महाराष्ट्राला गतवर्षी मुलांच्या गटात चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. यंदा मात्र यजमानांनी विजेतेपदाचा निर्धार केला आहे.महाराष्ट्राच्या संघात मुंबई शहर, उपनगर, ठाणे, गोंदिया, सातारा आणि कोल्हापूर येथील खेळाडूंचा समावेश आहे. तसेच मुलांच्या संघात अमय पोद्दार, शेहबाझ कपूर आणि ईश्वर राठोड या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असून मुलींच्या संघात भारताची अव्वल खेळाडू रुची शेट्टीचा समावेश आहे. (क्रीडा प्रतिनिधी)>स्पर्धेत सहभागी संघ :मुले : महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ, पंजाब, तामिळनाडू, दमण, उत्तराखंड, ओरिसा, हरियाणा, गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, जम्मू - काश्मिर, छत्तिसगड, बिहार, राजस्थान आणि आंध्र प्रदेश.मुली : महाराष्ट्र, ओरिसा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल, जम्मू - काश्मिर, बिहार, दिल्ली, राजस्थान, केरळ आणि आंध्र प्रदेश.