शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत राष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आवश्यक

By admin | Updated: March 5, 2017 04:01 IST

सिनेस्टार आमिर खानच्या दंगल चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली महिला मल्ल बबिता फोगाट हिने देशात महिला कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामीण भागातील

भोपाळ : सिनेस्टार आमिर खानच्या दंगल चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली महिला मल्ल बबिता फोगाट हिने देशात महिला कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामीण भागातील शाळांमध्ये राष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. गाव व शालेय स्तरावरून विद्यार्थ्यांच्या जीवनाला सुरुवात होत असते, असे बबिताने म्हटले आहे. ‘दंगल’ चित्रपट बबिता फोगाटच्या जीवनावर आधारित आहे. बबिता म्हणाली, ‘‘महिला कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी गाव व शालेय पातळीवर राष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करूण देणे आवश्यक आहे. कुस्तीचा स्पर्धात्मक माहोल निर्माण केला, तर या खेळात चांगले निकाल मिळू शकतात. जर कुठल्या संस्थेची किंवा सरकारची मदत मिळाली, तर कुस्ती अकादमी सुरू करण्याची इच्छा आहे.’’ महिला कुस्तीमध्ये पूर्वीच्या तुलनेत आता बरीच सुधारणा झाली आहे. सुरुवातीला भारतात महिला मल्ल नव्हत्या. महिला कुस्तीमध्ये प्रशिक्षकांची उणीव नाही, असेही तिने एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. दंगल चित्रपटामुळे महिला कुस्तीबाबत लोकांची धारणा बदलली. लोकांना यामध्ये आवड निर्माण झाली. अनेक लोक आपल्या मुलींना माझ्या बाबांच्या आखाड्यामध्ये कुस्तीचे प्रशिक्षण घेण्यासाठी दाखल करतात; पण आमच्याकडे पुरेशा सुविधा नाहीत.’’ (वृत्तसंस्था) चाहत्यांच्या प्रेमामुळेच येथवर पोहोचलोदंगल हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर खासगी जीवनावर बराच प्रभाव पडला. त्यामुळे जीवनात आमूलाग्र बदल झाला. चाहत्यांच्या प्रेमाचा आम्ही अव्हेर करू शकत नाही. चाहत्यांमुळेच आम्ही येथवर पोहोचलो आहोत, हे विसरता येणार नाही. चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे खेळाडू म्हणून आमच्यावर कुठलेही दडपण आलेले नाही. पदक पटकावणे आमच्या हातात नसते. मेहनत घेण्यासाठी व चांगली कामगिरी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. उणिवा असतील तर त्या दूर करण्याचा प्रयत्न करतो. -बबिता फोगाट