शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नरसिंगला मिळाला ‘ग्रीन सिग्नल’

By admin | Updated: August 4, 2016 12:18 IST

डोपिंग टेस्टमध्ये अडकल्यानंतर उठलेल्या मोठ्या वादळाला यशस्वीपणे थोपवून भारताचा मल्ल नरसिंग यादव अखेर रिओ आॅलिम्पिकसाठी सज्ज झाला

नवी दिल्ली : डोपिंग टेस्टमध्ये अडकल्यानंतर उठलेल्या मोठ्या वादळाला यशस्वीपणे थोपवून भारताचा मल्ल नरसिंग यादव अखेर रिओ आॅलिम्पिकसाठी सज्ज झाला आहे. ‘युनायटेड वर्ल्ड रेसलिंग’ अर्थात जागतिक कुस्ती संघटनेने (यूडब्ल्यूडब्ल्यू) नरसिंगला बुधवारी आॅलिम्पिकसाठी हिरवा झेंडा दाखवून भारतातील तमाम क्रीडाप्रेमींची अपेक्षापूर्ती केली. उत्तेजक द्रव्य घेतल्याच्या आरोपामुळे नरसिंगवर तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. मात्र याबाबत झालेल्या लांबलचक सुनावणीनंतर सोमवारी राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंध संस्थेने (नाडा) त्याला क्लीन चिट देत मोठा दिलासा दिला होता. मात्र, आॅलिम्पिकमधील सहभागनिश्चितीसाठी नरसिंगला जागतिक कुस्ती संघटनेकडून परवानगी मिळणे अनिवार्य होते. आॅलिम्पिकला सुरुवात होण्याच्या दोन दिवस आधी जागतिक कुस्ती संघटनेने स्पर्धेत सहभागी होण्यासाठी परवानगी दिल्यानंतर नरसिंगचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. विशेष म्हणजे, भारतीय कुस्ती संघटेनेचे अध्यक्ष ब्रजभूषण शरणसिंग यांनी याबाबत शिक्कामोर्तब करताना सांगितले, ‘‘यूडब्ल्यूडब्ल्यूने अधिकृतपणे नरसिंगला रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली आहे.’’ डोपिंगच्या आरोपातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर नरसिंगला आॅलिम्पिकसाठी मान्यता मिळावी, यासाठी आपण जागतिक उत्तेजक प्रतिबंध संस्थेला (वाडा) आणि जागतिक कुस्ती संघटनेला पत्र लिहिणार असल्याचे ब्रजभूषण यांनी सांगितले होते. (वृत्तसंस्था) >डोपिंगमध्ये अडकल्यानंतर नरसिंगने मिळवून दिलेला आॅलिम्पिक कोटा वाचविण्यासाठी भारताने तत्काळ त्याच्या जागी ७४ किलो वजनी गटात प्रवीण राणाची जागतिक कुस्ती संघटनेकडे शिफारस केली होती. या संघटनेने आता नरसिंगला ग्रीन सिग्नल दिल्याने अर्थातच राणाऐवजी नरसिंग ७४ किलो वजन गटात आपला दम दाखवणार आहे.१९ आॅगस्टपासून पुरुषांच्या कुस्ती लढतीला सुरुवात होईल.>‘वाडा’कडूनही चाचणी होणार?जागतिक कुस्ती संघटनेने ग्रीन सिग्नल दिला असला, तरी जागतिक उत्तेजक प्रतिबंध संस्था (वाडा) पुन्हा एकदा नरसिंगची चाचणी घेणार असल्याचे कळते. ‘नाडा’कडून नरसिंगला मिळालेल्या क्लीन चिटबाबत असलेल्या संभ्रमामुळे ‘वाडा’ने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.