शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नरसिंग प्रकरण : साई, नाडाच्या अधिकाऱ्यांचा कटात सहभाग!

By admin | Updated: August 23, 2016 21:29 IST

मल्ल नरसिंग यादव याला भक्कम पाठिंबा देणाऱ्या भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय)मंगळवारी नवा आरोप केला.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २३ : मल्ल नरसिंग यादव याला भक्कम पाठिंबा देणाऱ्या भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय)मंगळवारी नवा आरोप केला. नरसिंगच्या डोपिंग कटकारस्थानात भारतीय क्रीडा प्राधिकरण(साई)तसेच राष्ट्रीय डोपिंगविरोधीसंस्थेचे(नाडा)काही अधिकारी गुंतले असल्याचे डब्ल्यूएफआय म्हटले आहे.

क्रीडा लवादाने नरसिंगवर चार वर्षांची बंदी घातली. त्यामुळे रिओ आॅलिम्पिकच्या ७५ किलो फ्री स्टाईल प्रकारात तो खेळू शकला नाही. नाडाने नरसिंगला क्लीन चिट दिल्यानंतर वाडाने(विश्व डोपिंविरोधी संस्था) आक्षेप घेत निर्णयाला आव्हान दिले. त्यानंतर लवादाने नरसिंगच्या विरोधात निर्णय दिला.

डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष बृजभूषणसिंग म्हणाले,आम्हाला रिओमध्ये लवादापुढे सुनावणीच्यावेळी काही नव्या गोष्टी कळल्या. नरसिंगची चाचणी इतक्या कमी वेळेत का करण्यात आली, अशी विचारणा वाडाने करताच नाडाने सांगितले की, साईच्या सोनिपत केंद्रातील ज्युनियर अधिकारी रमेश यांनी आमच्याकडे केंद्रातील काही खेळाडू प्रतिबंधित औषध घेत असल्याची लेखी तक्रार केली होती. याच तक्रारीच्या आधारे पुन्हा डोप परीक्षण झाले.

ज्या लोकांनी २५ जून रोजी झालेल्या पहिल्या चाचणीआधी नरसिंगच्या जेवणात उत्तेजक मिसळले त्यांनीच पुन्हा एकदा हे काळे कृत्य केल्यानंतर रमेश यांनी नाडाकडे तक्रार पत्र पाठविले होते. नरसिंगच्या लघवीचा नमुना २७ जूनला घेण्यातआला, त्यात प्रतिबंधित पदार्थ आढळला होता. नाडाचे ज्युनियर अधिकारी यात सामील असावेत, असा माझा अंदाज आहे.बृजभूषण पुढे म्हणाले,ह्य डब्ल्यूएफआयला आधी या तक्रारीची माहिती देण्यात आली नव्हती. रिओमध्ये आमच्याकडे हे पत्र असते तर आमची बाजू भक्कम ठरली असती. नाडाने देखील अशा पत्राची माहिती दिली नसल्याने माझा संशय वाढला.

या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडे मी मागणी करणार आहे. नरसिंग दोषी असेल तर त्यालाही कठोर शिक्षा व्हावी, अशी आपली भूमिका आहे. हा मोठा कट असल्याच्या भूमिकेवर ठाम असलेले बृजभूषण म्हणाले, मी सुनावणीच्यावेळी उपस्थित होतो. कॅसच्या तज्ज्ञाने नरसिंगने टॅबलेट घेतल्याचा दावा केला पण त्यादृष्टीने पुरावे दिले नाहीत. सोनिपत पोलिसांनी गुन्हे नोंदविण्यात आणि आरोपींना शोधण्यात हयगय केल्यामुळे नरसिंगवर चार वर्षांची बंदी लागली. पोलिसांनी काहीच केले नाही. आजपर्यंत गुन्हेगार बाहेर आहेत, यासाठी पोलीस जबाबदार असल्याचा बृजभूषण यांनीपुनरुच्चार केला.