शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉ'क; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
2
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
3
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
4
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
5
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
6
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
7
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
8
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
9
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
10
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
11
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
12
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
13
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
14
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
15
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
16
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
17
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
18
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
19
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
20
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
Daily Top 2Weekly Top 5

‘नारायणा’स्त्रासमोर कामिल द्रागून निष्प्रभ

By admin | Updated: October 10, 2014 04:47 IST

जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेचा तिसरी फेरी ‘ड्रॉ’ने गाजल्यानंतर आज चौथ्या फेरीचा खेळ धक्कादायक निकालांनी गाजला.

अमोल मचाले, पुणेजागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेचा तिसरी फेरी ‘ड्रॉ’ने गाजल्यानंतर आज चौथ्या फेरीचा खेळ धक्कादायक निकालांनी गाजला. पोलंडचा ग्रॅण्डमास्टर कामिल द्रागून भारताच्या ‘नारायणा’स्त्रासमोर निष्प्रभ ठरला. मुलींच्या गटातही भारताच्या पद्मिनी राउतने इजिप्तची वूमन ग्रॅण्डमास्टर मोना खालेद हिला पराभवाचा शॉक दिला. अहमदनगर रोडवरील हयात हॉटेलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत आज सहाव्या पटावर झालेली द्रागून विरुद्ध नारायणन यांच्यातील लढत लक्षवेधी ठरली. या लढतीचा प्रारंभ पाहता पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळणारा द्रागून बाजी मारेल, असे वाटत होते. मात्र, भारताचा इंटरनॅशनल मास्टर असलेल्या सुनीलधूत नारायणन याने अफलातून व्युहरचना आखली. प्रतिस्पर्धी आपल्यासाठी जाळे विणतोय, याची कल्पना कामिलला बहुदा उशिरा आली. ४७व्या चालीत त्याने आपला पराभव मान्य केला.मुलींच्या गटात तिसरी मानांकित वूमन ग्रॅण्डमास्टर पद्मिनीने आज अप्रतिम चाली रचून मोना खालेदवर ४७ चालींनंतर सरशी साधली. बचावातील ‘रूय-लोपेझ’ या काहीशा दुर्लक्षित पद्धतीने पद्मिनीने प्रारंभ केला. पण, यापुढे तिने खूपच कल्पकतेने खेळ्या केल्या आणि मोनाला चुका करण्यास भाग पडले. ७ व्या चालीला वजीर डावाच्या बाहेर पडले होते आणि ४७ व्या चालीला जेव्हा मोना ने डाव सोडला तेव्हा पद्मिनी कडे एका प्याद्याची देखिल बढत नव्हती. परंतु, तिची स्थिती एवढी मजबूत होती की डाव सोडण्यावाचून मोनाकडे पर्यायच उरला नाही.