शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नकोडा, शांभव, तुलसी इलेव्हन विजयी

By admin | Updated: January 8, 2016 02:13 IST

एमपीएल : अरिहंत ईगल्स पराभूत

एमपीएल : अरिहंत ईगल्स पराभूत
नागपूर : नकोडा चॅलेंजर्ससह शांभव युनायटेड आणि तुलसी इलेव्हन संघांनी गुरुवारी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत महावीर प्रीमिअर लीग (एमपीएल) क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली. महावीर युवक मंडळातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नकोडा (१४) आणि अक्षद इलेव्हन (१३) संघांनी उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले.
पहिल्या लढतीत नकोडा चॅलेंजर्सने अक्षद इलेव्हनचा चार गडी राखून पराभव केला. अक्षद इलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना १० षटकांत ६ बाद ७९ धावांची मजल मारली. विकास बरमेचा आणि सुभाष लालवानी यांनी प्रत्येकी २५ धावांचे योगदान दिले. प्रतिस्पर्धी संघातर्फे राजेश जैनने दोन बळी घेतले. प्रत्युत्तरात खेळताना नकोडा चॅलेंजर्सने विजयासाठी आवश्यक धावा ४ गडी राखून अखेरच्या चेंडूवर पूर्ण केल्या. संघाच्या विजयात संदेश कोटेचा (१८) आणि मनीष सावला (१७) यांची भूमिका महत्त्वाची ठरली. कोटेचा समानवीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
शांभव युनायटेडने निशलिन चॅम्प्सचा ३४ धावांनी पराभव केला. यश मेहताच्या आक्रमक ४८ धावांच्या खेळीच्या जोरावर शांभव युनयाटेडने ६ बाद ११२ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात निशलिन चॅम्प्सचा डाव १० षटकांत ७८ धावांत रोखल्या गेला. भाविक (२०) आणि अमन जैन (१६) यांनी सन्मानजनक खेळी केली. हार्दिक शाह (३-१२) यशस्वी गोलंदाज ठरला.
तिसऱ्या लढतीत तुलसी इलेव्हनने अरिहंत ईगल्सचा २१ धावांनी पराभव केला. तुलसी इलेव्हनने ५ बाद १११ धावांची मजल मारली. निशांत देसाईने सर्वाधिक ३३ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात अरिहंत ईगल्स संघाचा डाव ७ बाद ९० धावांत रोखल्या गेला. प्रणव बोहराची ३५ धावांची खेळी अखेर व्यर्थच ठरली. तुलसी संघातर्फे नलिन बोरडिया (३-१५) यशस्वी गोलंदाज ठरला. (क्रीडा प्रतिनिधी)