शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

नजम सेठी यांची उमेदवारी मागे

By admin | Updated: June 2, 2015 01:06 IST

पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) माजी अध्यक्ष नजम सेठी यांनी सोमवारी आयसीसीच्या अध्यक्षपदाची आपली उमेदवारी मागे घेतली आणि या पदासाठी

कराची : पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) माजी अध्यक्ष नजम सेठी यांनी सोमवारी आयसीसीच्या अध्यक्षपदाची आपली उमेदवारी मागे घेतली आणि या पदासाठी एखाद्या महान क्रिकेटपटूला नामांकित करण्याचा आग्रह पीसीबीला केला आहे.याविषयी आयसीसीचे चेअरमन एन. श्रीनिवासन यांना त्यांनी पत्र लिहिले. त्यात सेठी म्हणतात, ‘पुढील वर्षी आयसीसीचे अध्यक्षपद हे फक्त आयकॉन टेस्ट क्रिकेटपटूंसाठी असणार आहे. याची घोषणा आयसीसीने केली आहे. ते सदस्य मंडळ नामांकित करतील. त्यामुळे हा नियम तत्काळ लागू करावा आणि पाकिस्तानच्या महान आयकॉन क्रिकेटरला हा सन्मान मिळावा. या परिस्थितीत मी अध्यक्षपदाचे आपले नामांकन तत्काळ मागे घेत आहे आणि पीसीबीचा बोर्ड आॅफ गव्हर्नर्सला माझ्या जागी पाकिस्तानच्या महान माजी कसोटीपटूला नामांकित करावे, असा आग्रह करीत आहे.’सेठी म्हणाले, ‘‘माझ्या या उशिरा घेतलेल्या निर्णयाने आणि त्यामुळे निर्माण झालेल्या असुविधेसाठी मी आयसीसीची माफी मागतो; परंतु ज्या भावनेने मी निर्णय घेतला आहे, त्या भावनेची आयसीसीचे सर्व सदस्य प्रशंसा करतील, असा मला विश्वास वाटतो.’’ सेठी या महिन्यात बार्बाडोसमधील आयसीसीच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीदरम्यान अध्यक्ष बनणार होते. ते बांगलादेशाचे मुस्तफा कमाल यांची जागा घेणार होते. श्रीनिवासन यांच्या मतभेदानंतर मुस्तफा कमाल यांनी राजीनामा दिला होता. पीसीबी सूत्रांनुसार बोर्ड आता सेठी यांच्या जागी अनेक माजी कसोटी कर्णधारांच्या नावांचा विचार करीत आहे. सूत्रांनुसार सध्या माजीद खान आणि झहीर अब्बास हे प्रबळ दावेदार मानले जातात. या पदाचा स्वीकार करण्यासाठी रमीझ राजा यांनाही आमंत्रित करण्याची चर्चा सुरू आहे; परंतु ते अनेक मीडियाशी कटिबद्ध झालेले आहेत. सेठी यांनी अंतिम क्षणी नामांकन मागे घेतल्यानंतर पीसीबी नेतृत्वातही बदल होऊ शकतो, असा युक्तिवाद सुरू आहे. सध्या शहरयार खान बोर्डाचे प्रमुख आहेत; परंतु सेठी यांच्याकडे भविष्यात पुन्हा पीसीबीच्या प्रमुखासाठी सर्वांत प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे.(वृत्तसंस्था)