दुखापतीमुळे नदालची माघार

By Admin | Updated: May 28, 2016 03:56 IST2016-05-28T03:56:05+5:302016-05-28T03:56:05+5:30

दिग्गज टेनिसपटू व नऊवेळा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या राफेल नदालने मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे शुक्रवारी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली. माघार घेतली असली

Nadal retracted due to injury | दुखापतीमुळे नदालची माघार

दुखापतीमुळे नदालची माघार

दिग्गज टेनिसपटू व नऊवेळा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या राफेल नदालने मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे शुक्रवारी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली. माघार घेतली असली तरी ही दुखापत म्हणजे माझ्या कारकिर्दीचा शेवट नाही, असे नदालने स्पष्ट केले. माघार घेण्याचा निर्णय जाहीर करताना चौथे मानांकन प्राप्त नदाल भावूक झाला होता.
नदाल म्हणाला, ‘माझा हात मोडला नसला तरी मी जर खेळणे कायम ठेवले तर आगामी काही दिवसांमध्ये नक्की मोडेल. माझी परिस्थिती चांगली, पण अखेर हे जीवन आहे. रोला गॅरो नसते तर कदाचित मी सुरुवातीचे दोन दिवस खेळण्याची जोखीमही पत्करली नसती.’
एकूण १४ ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावणाऱ्या नदालला कारकिर्दीत गुडघे व मनगटाच्या दुखापतींना सामोरे जावे लागले आहे. मनगटाच्या दुखापतीमुळे त्याला २०१४ च्या यूएस ओपन स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते.

Web Title: Nadal retracted due to injury