शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकर रायनचे शानदार विजेतेपद

By admin | Updated: September 7, 2015 00:26 IST

मुंबईकर रायन पंडोळे याने हैदराबाद येथे झालेल्या १८ वर्षांखालील आयटीएफ ज्युनियर (ग्रेड ४) स्पर्धेत शानदार विजेतेपद पटकावताना बिगरमानांकित सनील जगतीयानीचा २-० असा फडशा पाडला

मुंबई : मुंबईकर रायन पंडोळे याने हैदराबाद येथे झालेल्या १८ वर्षांखालील आयटीएफ ज्युनियर (ग्रेड ४) स्पर्धेत शानदार विजेतेपद पटकावताना बिगरमानांकित सनील जगतीयानीचा २-० असा फडशा पाडला. सलामीच्या सामन्यात बाय मिळाल्यानंतर रायनने संपूर्ण स्पर्धेत आक्रमक खेळाचा धडाका करताना विजेतेपदाला गवसणी घातली.तेलंगणा राज्य टेनिस संघटनेच्या वतीने हैदराबाद येथील एसएटीएस टेनिस कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रायनने एकहाती वर्चस्व राखले. ताकदवर सर्व्हिस, वेगवान खेळ या जोरावर वर्चस्व राखलेल्या रायनने ६-१, ६-२ असा सहज विजय मिळवताना संपूर्ण सामन्यात सनीलला फारशी संधीच दिली नाही. पहिल्याच सामन्यात पुढील फेरीसाठी चाल मिळाल्यानंतर रायनने यानंतर अनुक्रमे अंशुमन गुलीया आणि आदिल कल्याणपूरकर यांना सरळ दोन सेटमध्ये नमवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. यावेळी त्याने स्पर्धेतील पहिला अनपेक्षित निकाल नोंदवताना तृतीय मानांकित कसलेल्या ध्रुव सुनीशचा ६-७(२), ६-४, ६-० असा पराभव केला. हा विजय केवळ फ्ल्यूक नसल्याचे सिद्ध करताना त्याने उपांत्य फेरीत खळबळजनक निकाल नोंदवत थेट अव्वल मानांकित व संभाव्य विजेत्या वशिष्ठ चेरुकू याचे तगडे आव्हान ३-६, ७-६(३), ६-२ असे परतावले. पहिला सेट गमावल्यानंतरही रायनने झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना शानदार बाजी मारली.त्याचवेळी दुसऱ्या बाजूला सनीलने द्वितीय मानांकित अ‍ॅलेक्स सोलंकीला ७-६(२), ६-७(३), ६-१ असे नमवून अंतिम फेरी गाठली असल्याने रायन समोर विजेतेपदासाठी कडवे आव्हान होते. मात्र फुल फॉर्ममध्ये असलेल्या रायनने या निर्णायक सामन्यात आपला हिसका दाखवताना सनीलचा सहज धुव्वा उडवला. (क्रीडा प्रतिनिधी)