शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

रणजी चषकात मुंबईचा ४४ धावांत खुर्दा; दिवसभरात २२ बळींचा विक्रम

By admin | Updated: February 26, 2015 01:58 IST

बेंगळुरु येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरु असलेल्या मुंबई-कर्नाटक संघातील रणजी चषक स्पर्धेतील उपांत्यफेरीच्या सामन्यात

पुणे : बेंगळुरु येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरु असलेल्या मुंबई-कर्नाटक संघातील रणजी चषक स्पर्धेतील उपांत्यफेरीच्या सामन्यात दिवसभरात दोन्ही संघांचे २२ गडी बाद होण्याचा विक्रम बुधवारी झाला. कर्नाटकला पहिल्या डावांत २०२ धावांत गुंडाळल्यानंतर, तब्बल चाळीस वेळा रणजी चषक स्पर्धेतचा किताब पटकविणाऱ्या मुंबई संघाचा डाव अवघ्या ४४ धावांत संपुष्टात आला. मुंबईची ही आत्तापर्यंतची दुसरी निचांकी खेळी आहे. कर्नाटकचा कर्णधार आर. विनयकुमारने केवळ २० धावांत ६ गडी बाद करीत मुंबईच्या फलंदाजीच्या चिंध्या उडविल्या. कर्नाटकची दुसऱ्याडावात २ बाद १० अशी खराब सुरुवात झाली असली तरी त्यांच्याकडे १६८ धावांची आघाडी आहे. कर्नाटकने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीचा फलंदाज के. एल. राहुल (१५) याला शार्दुल ठाकूरने बी. एस. संधूकडे झेल देण्यास भाग पाडत कर्नाटकला पहिला धक्का दिला. पाठोपाठ आर. समर्थ (३) याला अखिल हेरवाडकर याने धावबाद केले. त्यामुळे कर्नाटकची अवस्था १ बाद १९ वरुन २ बाद ३४ अशी झाली. त्यानंतर आलेल्या एम. के पांडे (३४) याने सलामवीर रॉबिन उथप्पा (६८) याला सुरेख साथ दिली. उथप्पाने १ षटकार व १० चौकारांच्या सहाय्याने अर्धशतकी खेळी साजरी केली. या जोडीने ८१ धावांची भागिदारी केली. विल्किन मोटा याने उथप्पाला सुर्यकुमार यादव करवी झेलबाद करीत ही जोडी फोडली. त्यामुळे कर्नाटकची अवस्था ३ बाद ११५ झाली. त्यानंतर आलेल्या करुण नायर याने ७ चौकार व एका षटकाराच्या सहाय्याने ४९ धावांची नाबाद खेळी करीत संघाला द्वीशतकी मजल गाठून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कर्नाटकचे तळाचे फलंदाज झटपट बाद झाले. शार्दुल ठाकूर याने ४, विल्किन मोटा याने २ बळी घेत कर्नाटकला २०२ धावांत रोखण्याची कामगिरी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा डाव १५.३ षटकांत ४४ धावांत आटोपला. एस. अय्यर (१५), सुर्यकुमार यादव (१२) यांचा अपवाद वगळता मुंबईचा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या उभारु शकला नाही. मुंबईचा सलामवीर अखिल हेरवाडकर, विल्किन मोटा, हरमित सिंग, बी. एस. संधु हे फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत. आर. विनयकुमार याने २० धावांत ६, एस. अरविंद याने १ धावांत २ बळी घेत मुंबईची फलंदाजी मोडून काढली. दिवसाअखेर कर्नाटकच्या दुसऱ्या डावांत ५ षटकांत २ बाद दहा धावा अशी खराब सुरुवात झाली आहे. सलामवीर उथप्पा (४), केएल राहुल (२) झटपट बाद झाले. ए. मिथुन व आर. समर्थ खेळत आहेत.